🕒 1 min read
मुंबई : तौक्ते चक्रीवादळामुळे कोकणात प्रचंड नुकसान झालं असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून परिस्थितीची पाहणी करण्यात येत आहे. तौते चक्रीवादळात कोकणातील घरं, झाडं, फळबागा तसंच इतर गोष्टींचं नुकसान झालं आहे. राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसदेखील सध्या कोकण दौऱ्यावर असून नुकसानाची पाहणी करत आहेत. फडणवीस दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री कधी घऱाबाहेर पडणार अशी टीका विरोधकांकडून केली जात होती. त्यानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर आलेत.
त्यांच्या दौऱ्याचे अनेक वृत्तवाहिन्यांकडून लाईव्ह प्रक्षेपण सुरू आहे. हाच मुद्दा हेरून भारतीय जनता पक्षाचे नेते निलेश राणे यांनी मुख्यमंत्री ठाकरेंच्या दौऱ्यावर टीका केली आहे. ‘फडणवीस यांनी कोकण दौरा केला, म्हणून झक मारत मुख्यमंत्र्यांना यावे लागले’ असे वादग्रस्त वक्तव्य राणे यांनी केले आहे.
माध्यमांना देखील खरं वाटत नाही की उद्धव ठाकरे घराबाहेर पडले, सतत उद्धव ठाकरे कुठे पोहोचले याचा पाठलाग सुरू आहे. उद्धव ठाकरे यांचा कोकण दौरा म्हणजे नारळावर अक्षता टाकणं. फडणवीस साहेब कोकण दौऱ्यावर आले म्हणून झक मारत मुख्यमंत्र्यांना यावं लागलं, ही औपचारिकता आहे, दुसरं काही नाही.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) May 21, 2021
निलेश राणे म्हणाले की, ‘माध्यमांना देखील खरं वाटत नाही की उद्धव ठाकरे घराबाहेर पडले, सतत उद्धव ठाकरे कुठे पोहोचले याचा पाठलाग सुरू आहे. उद्धव ठाकरे यांचा कोकण दौरा म्हणजे नारळावर अक्षता टाकणं. फडणवीस साहेब कोकण दौऱ्यावर आले म्हणून झक मारत मुख्यमंत्र्यांना यावं लागलं, ही औपचारिकता आहे, दुसरं काही नाही.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फक्त गुजरातची पाहणी करुन मदत जाहीर केल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून टीका होत असताना कोकणासाठी मुख्यमंत्री किती मदत जाहीर करतात याकडे सर्वांचं लक्ष आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘भारत जागतिक अर्थव्यवस्थेला बळकटी देऊ शकतो’, परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांचे मत
- कोरोना आटोक्यात कसा येणार? देशातील निम्मे लोक मास्कच वापरत नाहीत
- पंतप्रधान मोदींकडून हिवरेबाजारच्या कोरोना प्रतिबंधक कामांची दखल
- पुण्याला दिलासा ; आज नव्या कोरोना बाधितांचा आकडा हजाराच्या आत
- पोलीस भरतीबाबत लवकरच निर्णय जाहीर करू : गृहमंत्री वळसे-पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
