Share

क्रिकेट प्रेमींना महिला क्रिकेट लीगची पर्वणी

Published On: 

मुंबई:  क्रिकेट खेळाकडे भारतात एक धर्म म्हणून बघितले जाते. भारतीय क्रिकेट संघ पण जगभरात आपला वारू उधळत असतो. भारतात अनेक क्रिकेट प्रेमी आढळतात. २००८ मध्ये सुरु झालेल्या आयपीएल ने भारतीय क्रिकेट मध्ये एका नवीन अध्यायाची सुरुवात केली. पुरुष क्रिकेट खेळाडूंना देशाबाहेरच्या कुठल्याही क्रिकेट लीग मध्ये खेळायचा अधिकार नाही. मात्र महिलांना जगभरात कुठल्याही क्रिकेट स्पर्धेत भाग घेता येतो. भारतीय पुरुष क्रिकेटपटूंना इतर कोणत्याही लीगमध्ये भाग घेण्याची परवानगी नाही, पण भारतीय महिला संघातील खेळाडू इतर देशांच्या टी-२० लीगमध्ये जोरदार प्रदर्शन करताना दिसत आहेत.

ऑस्ट्रेलियाच्या बीबीएलपासून ते न्यूझीलंडच्या सुपर लीगपर्यंत भारतीय महिला खेळाडूंनी आपला दबदबा ठेवला आहे. जशी पुरुषांची आयपीएल स्पर्धा भरवण्यात येते तशीच स्रीयांची पण स्पर्धा भरवण्यात यावी अशी मागणी देशभरातून करण्यात येत आहे. या महिलांच्या क्रिकेट स्पर्धेबद्दलच बीसीसीआय कडून एक चांगली बातमी येण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे. महिला टी-२० चॅलेंज ट्रॉफी सुरू झाल्यापासून अनेक आजी-माजी खेळाडूंनी महिलांचीही आयपीएल स्पर्धा भरविण्यात यावी, अशी मागणी केली आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी याबाबत मोठे अपडेट दिले आहेत. यावर्षीही मे महिन्यात पुन्हा एकदा महिला चॅलेंजर्स ट्रॉफीचे आयोजन करण्यात येणार आहे. आगामी काळात महिला आयपीएलचेही आयोजन करण्यात येणार असल्याचे गांगुली यांनी स्पष्ट केले.

महिलांच्या चॅलेंजर्स ट्रॉफीचे गेल्या वर्षी बीसीसीआयने यशस्वी रित्या आयोजन केले होते. त्यामुळे महिलांची आयपीएल स्पर्धा पण भरवण्यात यावी अशी मागणी भारतातील समस्त क्रिकेट प्रेमी लोकांकडून होत होती. यावर विचार करून बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी महिलांची पण आयपीएल स्पर्धा भरवण्यात येईल अशी आज घोषणा केली आहे. बीसीसीआय अध्यक्षांनी सांगितले की, ‘टीम इंडिया आगामी काळात कसोटी सामने खेळेल. आणि आगामी काळात आम्ही महिला आयपीएलचे मोठ्या स्तरावर आयोजन करू. जेव्हा महिला खेळाडूंची संख्या वाढेल, तेव्हा आयपीएल स्पर्धा नक्कीच होईल. यंदाही महिला चॅलेंजर्स ट्रॉफीचे आयोजन आयपीएल प्लेऑफ दरम्यान केले जाणार आहे.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!