मुंबई : दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदानाचा ‘पुष्पा’ चित्रपटाने ( Pushpa) सर्वत्र प्रचंड गाजला आहे. तसेच कमाईचे अनेक रेकॉर्ड ब्रेक ही केले आहे. चित्रपटातील डायलॉग आणि गाणी व्हायरल झालेत. ‘श्रीवल्ली’ गाण्याचं तेलगू, मराठी, हिंदी भाषेतील व्हर्जन आपण ऐकलं आहे. मात्र या गाण्याचं काश्मिरी व्हर्जन (Kashmiri Version of Srivalli Song) ऐकलंय का. सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
दरम्यान अल्लू अर्जुनचा सुपरहिट ठरलेल्या ‘पुष्पा’ची चर्चा आजवर कायम सुरू आहे. विशेष म्हणजे या चित्रपटातील ‘श्रीवल्ली’ या गाण्यान तर सर्वांना वेडच लावलं असून अनेक भाषेत ऐकायला ही मिळालं आहे. आता चक्क ‘श्रीवल्ली’ काश्मिरी व्हर्जनची जोरदार चर्चा सुरू आहे. हे गाणं बनवणाऱ्याचं नाव तस्लीम (singer Taslim) आहे. हारर्मोनियमवरच्या त्याच्या या गाण्याला सोशल मीडियावर पसंती मिळत आहे. काश्मिरी फोक म्युझिकसोबत Kashmiri folk music) तस्लीमने ‘श्रीवल्ली’ गाण्याला एक वेगळाच टच दिला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
दाक्षिणात्य भाषेतील ‘पुष्पा’ चित्रपटातील ‘श्रीवल्ली’ हे मुळ गाणं देवी श्री प्रसादने कम्पोझ केलं आहे. चंद्रबोसने याचे बोल लिहिलं आहे. गाण्याचं तेलगू व्हर्जन सिंगर सिड श्रीरामने गायलं असून हेच गाणं हिंदी व्हर्जनमध्ये जावेद अलीने गायलं आहे.आजवर या गाण्यावर अनेक रिल्स आणि विविध सेलिब्रिटींनी देखील हटके व्हिडीओ बनवून शेअर केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

