🕒 1 min read
मुंबई: अँटिलियासमोर ठेवलेल्या स्फोटक प्रकरणी तसेच १०० कोटी वसूली प्रकरणी अनेक नवीन खुलासे होताना दिसत आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह (Parambir Singh) यांनी धक्कादायक खुलासा केला होता. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या सांगण्यावरूनच त्यांनी सचिन वाझेला पुन्हा कामावर घेतले होतं, असा खुलासा त्यांनी ईडीला २ फेब्रुवारीला दिलेल्या स्टेटमेंटमध्ये केला होता.
तसेच आता माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी देखील काही धक्कादायक माहिती सांगितली आहे. ५ मार्च २०२१ रोजी विधानसभा सुरू असताना सिंह यांना विधानसभेत ब्रीफिंगसाठी बोलावलं होतं, तेव्हा मी गृहमंत्री होतो आणि सिंह यांना बोलावलं तेव्हा मी, अतिरिक्त मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, लिमये आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होतो. त्या ब्रीफिंग दरम्यान अँटिलिया प्रकरण आणि मनसुख हत्येच्या संदर्भात सिंह देत असलेली ब्रीफिंग दिशाभूल करणारी होती, असं देशमुखांनी ईडीच्या जबाबात म्हटलं आहे.
तसेच पुढे बोलताना अनिल देशमुख म्हणाले, अँटिलियासमोर स्फोटकं ठेवल्याप्रकरणी आपल्याला माहिती देताना परमबीर सिंह दिशाभूल करत होते. कारण या प्रकरणात त्यांचे सहकारी सचिन वाझे यांचं नाव समोर आलं होतं आणि सिंह हेच त्याचे मास्टरमाईंड आहेत, असं आपल्याला कळलं होतं. म्हणून त्यांना आयुक्तपदावरून हटवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर त्यांनी आपल्यावर खोटे आरोप केले आणि नैतिकता म्हणून आपण गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला, असं अनिल देशमुख यांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या:
-
Board Exams: औरंगाबादेत शिक्षण संस्था महामंडळाचा दहावी-बारावी बोर्डांच्या परिक्षांवर बहिष्कार..!
-
“मी अष्टपैलू खेळाडू आहे पण हार्दिकसोबत तुलना करू नका” शार्दुलचे मोठे वक्तव्य
-
“मराठी पाट्यांसाठी आग्रह धरणाऱ्या शिवसेनेने आपली सत्ता…”, भातखळकरांचा हल्लाबोल
-
परमबीर सिंहनंतर आता सीताराम कुंटेंचा खळबळजनक दावा; “मुख्यमंत्र्यांनी केलेल्या फोनमुळे..”
-
“खिशात देशी दारु आणि दारूच्या नशेत धूत…”; व्हिडिओ ट्वीट करत पडळकरांची सत्ताधाऱ्यांवर टीका

