Share

“खिशात देशी दारु आणि दारूच्या नशेत धूत…”; व्हिडिओ ट्वीट करत पडळकरांची सत्ताधाऱ्यांवर टीका

Published On: 

पुणे: सध्या राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध भाजपचे राजकारण जोरात सुरू आहे. महाराष्ट्र शासनाने किराणा दुकानात (सुपर मार्केट) मध्ये वाईन विक्रीस परवानगी दिल्याने गेले २ आठवडे दोनही पक्षात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान भाजपचे विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी या वादात आणखी एक नवीन मुद्दा उपस्थित केला आहे.

एका खासगी कार कंपनीच्या (OLA) ड्रायवरचा व्हिडिओ शेयर करत त्यांनी पुन्हा सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्याचा प्रयत्न केला आहे. व्हिडिओ मधील ड्रायवर हा एका खाजगी कार कंपनीचा ड्रायवर असून त्याच्या खिश्यात दारूची बाटली मिळाली असून  तो दारूच्या नशेत आहे. तसेच व्हिडिओ काढणाऱ्या ग्रामस्थांनी त्याची विचारपूस केली असता तो दारू प्यायल्याचे कबूल करतो आहे आणि तिथे त्या अवस्थेत एक सवारी (Passenger) घेण्यासाठी आला आहे.

फेसबूकवर एक व्हिडिओ शेयर करत, त्यांनी खासगी चारचाकी गाड्या सध्या सर्रास सर्वच वापरत असून परवानाधारक रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या पोटावर लाथ मारली जात आहे, हे खासगी कार चालक अशी दारू पिऊन गाडी चालवून प्रवाश्यांचा जीव धोक्यात घालत आहेत. हे सर्व अजित पवारांच्या आशीर्वादाने होते आहे? वसुलीचे लाभार्थी कोण? मद्यधुंद सरकार तोकड्या पैशांसाठी जनतेचा जीव धोक्यात घालणार का ? असे प्रश्न सरकारला उपस्थित केले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!