Share

Board Exams: औरंगाबादेत शिक्षण संस्था महामंडळाचा दहावी-बारावी बोर्डांच्या परिक्षांवर बहिष्कार..!

Published On: 

औरंगाबाद: महाराष्ट्र राज्य संस्था महामंडळाचे महत्त्वाची बैठक आज औरंगाबादेत पार पडली. या बैठकीत होऊ घातलेल्या दहावी-बारावीच्या परीक्षांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय महाराष्ट्र शिक्षण संस्था महामंडळाचे अध्यक्ष विजय नवल पाटील(Vijay Patil) यांनी घेतला आहे. शिक्षण संस्थांचे राज्य सरकारकडे कोट्यवधी रुपयांचे अनुदान थकले आहे. अनुदानाअभावी संस्थांना शाळा चालवणे अवघड होत असल्याचा आरोप राज्य सरकार शिक्षण संस्थांना कर्ज देत असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला.

पत्रकार परिषदेत विजय नवल पाटील म्हणाले, दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षांवर बहिष्कार घालत असल्याची माहिती १५ दिवसांपूर्वी सरकारला कळवली आहे. मात्र अजून याबाबत त्यांचे काहीही उत्तर आलेले नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळांची निर्जंतुकीकरण करणे, विद्यार्थ्यांना कोरोना प्रतिबंधात्मक साहित्य पुरवणे, शैक्षणिक साहित्य या सर्व बाबींवर खर्च करावा लागतो. आणि हा खर्च संस्थांनी करावा असे सरकारला अपेक्षित आहे. मात्र त्यासाठी लागणारे वेतन वेळेवर दिले जात नाही. याआधी सत्तेत असलेल्या शिक्षण मंत्र्यांनाही यावरून भांडलेलो आहे. आता सत्तेत असलेल्यांकडून ही तेच सुरू आहे. अनुदान मिळत नसल्याने शाळा चालवायच्या कशा? असा प्रश्न आमच्यापुढे उपस्थित झाला आहे.

त्यामुळे झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी बोर्डाच्या परीक्षांवर बहिष्कार घालण्याचे ठरवले आहे. या परीक्षांसाठी आम्ही शाळाही उपलब्ध करून देणार नाही. असेही ते म्हणाले. त्याचप्रमाणे टीईटी परीक्षेत झालेल्या घोटाळ्याने शिक्षण क्षेत्र नष्ट झाले आहे. सरकार घेत असलेल्या परीक्षा प्रक्रियेवरील सामान्यांचा विश्वास उडत चालला आहे. त्यामुळे ही परीक्षा घेणारे शिक्षक भरती हे पवित्र पोर्टल रद्द करावे अशी मागणी या वेळी करण्यात आली. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिपाई नको असा आदेश देण्यात आला आहे. तो आदेश परत रद्द करण्यात यावा. अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

महत्त्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!