मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यभरात मराठी पाट्यांच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापलेले बघायला मिळत आहे. तसेच यावरून आरोप-प्रत्यारोपाचे वारे वाहू लागले आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी केलेल्या वक्तव्यावरून नव्या वादाला सुरुवात झाली आहे. असे असतांनाच आता भाजप नेते अतुल भातखळकर(Atul Bhatkhalkar) यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.
यासंदर्भात अतुल भातखळकर यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘मराठी पाट्यांसाठी आग्रह धरणाऱ्या शिवसेनेने आपली सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पाचे ट्विट मात्र इंग्रजीतून केलेले आहेत. संजय राऊत जरा लक्ष द्या’, असे भातखळकर म्हणाले आहेत.
मराठी पाट्यांसाठी आग्रह धरणाऱ्या शिवसेनेने आपली सत्ता असलेल्या @mybmc च्या अर्थसंकल्पाचे ट्विट मात्र इंग्रजीतून केलेले आहेत. संजय राऊत जरा लक्ष द्या… pic.twitter.com/A0A9odoAxE
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) February 3, 2022
दरम्यान, १२ जाने. रोजी मंत्रीमंडळाने महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम, २०१७ यात सुधारणा करण्याचा व पळवाट बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मोठ्या प्रमाणेच छोट्या दुकानावरील पाट्याही आता मराठीत कराव्या लागतील. मराठीत-देवनागरी लिपितील अक्षरे दुसऱ्या (इंग्रजी किंवा अन्य) लिपीतील अक्षरांपेक्षा लहान ठेवता येणार नाहीत, अशीही दुरुस्ती मंजूर करण्यात आली. दुकानांच्या पाट्या मराठीत असण्याबाबत ‘महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम २०१७ हा अधिनियम लागू होत असल्याने दहापेक्षा कमी कामगार असलेल्या आस्थापना व दुकाने नियमातून पळवाट काढत असल्याचे आढळून आले आणि त्यासंदर्भात अनेक तक्रारी देखील राज्यसरकारकडे आल्या होत्या. त्यानुसार राज्याचे मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी यासाठी मंत्रालयात संबंधीतांची बैठक घेतली व कायदा सुधारण्याचा निर्णय घेतला.
महत्वाच्या बातम्या:
- “व्वारे व्वा नवाब साहेब, हर्बल गांजा वाले आपली नशा…”, सदाभाऊंचा खोचक टोला
- “मच्छीमार, रिक्षावाले, बलुतेदारांचा विचार नाही… टेंडर आणि बिल्डर मात्र जोरात”, मुंबई अर्थसंकल्पावरून आशिष शेलारांची टीका
- “बचावासाठी आरोपी इतरांची नावं घेत असतो..”; परमवीर सिंहाच्या खुलाशाला राऊतांचे प्रतिउत्तर
- कोव्हिशिल्ड लसीमुळे माझ्या मुलीचा मृत्यू; औरंगाबादच्या वडिलांची १ हजार कोटींची भरपाईची मागणी!
- खिशात देशी दारु आणि दारूच्या नशेत धूत… गोपीचंद पडळकर


