🕒 1 min read
मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता विधानसभा अध्यक्षपदाच्या उमेदवार निवडीसाठी राज्यपालांनी दोनदा पत्रे पाठवले होते. यावर आता काँग्रेसचे नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी याबाबत लवकर निर्णय घेण्याची मागणी केली आहे.
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीसाठी राज्यपालांनी दोनदा पत्रं पाठवलं होतं. त्यामुळे आज आम्ही त्यांना भेटून निवडणुकीची माहिती देणार आहोत. त्यावर राज्यपालांनी आता निर्णय घेतला पाहिजे. सरकार वेगळे आहे म्हणून ते विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक रोखणार नाहीत अशी आशा आहे, असे राज्याचे मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज स्पष्ट केले आहे.
महाविकास आघाडीचे नेते संध्याकाळी राज्यपालांना भेटणार आहेत. अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेत आघाडीने बदल केला आहे. त्यामुळे राज्यपाल काय निर्णय घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. ‘विधानसभेचे अध्यक्षपद एक वर्षापासून रिक्त आहे. कोरोना संकटामुळे उशीर झाला आहे. लोकसभेत ज्या पद्धतीने अध्यक्षाची निवड होते, तीच पद्धत आम्ही अवलंबली आहे. लोकसभेत आवाजी मतदानाने निवडणूक होते. राज्यात 1960पासून अध्यक्ष निवडीचा एकच नियम होता. आम्ही हा नियम बदलला आहे’, असेही बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत.
लोकसभेलाच आम्ही फॉलो करत आहोत. राज्यपाल त्याला मान्यता देतील अशी आशा आहे. राज्यपालांनीच विधानसभेच्या अध्यक्षाची निवड करण्यासाठी आग्रह धरला होता. त्यांनी दोनदा मुख्यमंत्र्यांना पत्रं लिहिलं होतं. त्यामुळे सरकार वेगळं आहे म्हणून राज्यपाल अध्यक्षपदाची निवड रोखणार नाहीत अशी आशा आहे, असा टोला थोरात यांनी लगावला. आम्ही राज्यपालांना आज भेटणार आहोत. या शिष्टमंडळात राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे असतील, असेही बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- पवार साहेबांचा वारसा यशस्वीपणे चालवत असल्याचे अजित दादांनी आज सिद्ध केले- रुपाली पाटील
- ‘मी ‘त्या’ खुर्चीत असतो तर एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन एवढे दिवस चालले नसते’
- राष्ट्रवादी आणि आरएसएसचे संबंध कोणापासून लपलेले नाहीत; प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
- बडतर्फीची कारवाई अधिक तीव्र करणार; अनिल परब यांचा इशारा
- “लोकशाहीच्या परंपरेचं पालन राज्यकर्ते करतीलच पण राज्यपाल…”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
