Share

राष्ट्रवादी आणि आरएसएसचे संबंध कोणापासून लपलेले नाहीत; प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य

Published On: 

🕒 1 min read

नागपूर : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar in Nagpur) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP)वर गंभीर आरोप केले आहेत. आज नागपूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना प्रकाश आंबेडकरांनी राष्ट्रवादी आणि आरएसएसवर आरोप केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संबंध कोणापासून लपलेले नाहीत. संघाचा मुस्लिम आरक्षणाला विरोध असल्यानेच राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) मुस्लिम आरक्षणाबद्दल मुस्लिमांची दिशाभूल करत आहे. त्यामुळे आता मुस्लिमांनीच ठरवावे की, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि नवाब मालिकांच्या मागे उभे राहावे की नाही, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून आता याबाबत काय प्रतिक्रिया येतेय हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, ओबीसी आरक्षणाबाबत बोलताना, ‘राज्य सरकार राज्याच्या मागास वर्ग आयोगामार्फत इम्पेरिकल डेटा गोळा करण्याचा अट्टाहास करत आहे. मात्र, राज्य मागास वर्ग आयोगाला खरोखरच स्वतःहून ओबीसींची गणना करण्याचे अधिकार आहेत का? आयोगाची निर्मिती करताना राज्य सरकारने आयोगाच्या अटीशर्तींमध्ये तशी तरतूद केली आहे का? याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी करावा’, अशी मागणीही प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!