Share

नव्या व्हेरिएंटचा धोका; एकनाथ शिंदेंनी दिल्या प्रशासनाला ‘या’ सूचना

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: परदेशात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा मोठा धोका वाढला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज तातडीची बैठक घेऊन प्रशासनाला सूचना केल्या. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार देखील सावध झालं आहे. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी नव्या व्हेरिएंटचा धोका लक्षात घेता प्रशासनाला सूचना दिल्या आहेत.

नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, महानगरपालिकांचे आयुक्त, नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे तातडीची बैठक घेतली. यावेळी शिंदे यांनी सर्व रुग्णालये तसेच कोविड उपचार केंद्रांमधील आयसीयू, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर उपकरणांची तपासणी करा. त्या कार्यरत करण्यासाठी सज्ज करून ठेवण्याचे निर्देशही शिंदे यांनी आज दिले.

गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या (Corona patient count) राज्यात घटते आहे, त्यामुळे सामान्य नागरिकांकडून कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे कठोरपणे पालन होत नसल्याचे निदर्शनास आले. मात्र आता आपल्याला गाफिल राहून चालणार नाही. कोणत्याही संकटाचा मुकाबला करण्यासाठी महानगरपालिका, नगरपालिकांची रुग्णालये सज्ज ठेवा, सर्व रुग्णालयांच्या इमारतींचे संरचनात्मक, अग्निशमन, आणि विद्युत ऑडिट तातडीने करुन घ्या, अशा सूचना एकनाथ शिंदे यांनी दिल्या.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!