🕒 1 min read
मुंबई: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) दोन दिवस मुंबईच्या दौऱ्यावर आल्या होत्या. यावेळी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांची भेट घेतल्याननंतर ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी ममता बॅनर्जी यांनी भाजप सोबतच कॉंग्रेसवर देखील निशाणा साधला होता.
ममता बॅनर्जी यांनी कॉंग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर टीका करताना म्हणाल्या, परदेशात राहून राजकारण करता येत नाही. रस्त्यावर उतरला नाही, तर भाजप तुम्हाला क्लीन बोल्ड करेल, असा टोला ममता बॅनर्जी यांनी लगावला होता. यावर कॉंग्रेस नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ममता बॅनर्जी यांनी या टिकेल कॉंग्रेस नेत्यांकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. यातच कॉंग्रेस नेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी पलटवार केला आहे.
बाळासाहेब थोरात प्रत्युत्तर देताना म्हणाले, भाजप आणि केंद्र सरकारच्या दडपशाहीच्या विरोधात कॉंग्रेसच लढत आहे हे देशाला माहीत आहे. आपल्या राजकीय फायद्यासाठी व वैयक्तिक महत्वाकांक्षांसाठी सोयीप्रमाणे भूमिका घेऊन कोणत्याही पक्षाला भाजपविरोधात लढता येणार नाही. कॉंग्रेस हाच देशासाठी आणि लोकशाहीसाठी सक्षम पर्याय आहे, असे मत बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- दुसऱ्या कसोटीच्या खेळपट्टीबाबत मोठी अपडेट, टीम इंडियाला होऊ शकतो तोटा!
- किरॉन पोलार्डला मुंबई इंडियन्ससोबत कायम ठेवण्याचे मोठे कारण आले समोर
- ममतांच्या मुंबई दौऱ्यावर आक्षेप घेणाऱ्यांना संजय राऊत यांचा टोला
- विजय हजारे ट्रॉफीचे सामने चेन्नईत नाही तर ‘या’ ठिकाणी होणार
- मुंबई कसोटीसाठी भारतीय प्लेइंग इलेवनवर माजी पाकिस्तानी खेळाडूची प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
