मुंबई : घरगुती गॅस सिलेंडर महागला असून सर्वसामान्यांना महागाईचा चांगलाच फटका बसला आहे. फक्त इतकेच नाही तर पेट्रोल आणि डिझेलमध्येही दिवसेंदिवस वाढ होत चालल्याचे चित्र बघायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून महागाई मुक्त भारत मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, या मोर्चामध्ये सहभागी होण्याचे आवाहन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी केले आहे.
यासंदर्भात बाळासाहेब थोरात यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘केंद्रातील भाजप सरकार इंधन आणि गॅसची दरवाढ करून सर्वसामान्यांची लूट करत आहे. ही अन्यायकारक दरवाढ मागे घ्यावी या मागणीसाठी काँग्रेस पक्षाच्या महागाई मुक्त भारत मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हा’, असे थोरात म्हणाले आहेत.
दरम्यान, या मुद्यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी देखील मोदी सरकारवर टीका केली असून मोदी सरकारकडून इंधन दरवाढीतून गोरगरीबांची लूट सुरुच आहे. आज पेट्रोल-डिझेलच्या दरात आणखी ८० पैशांच्या वाढीसह दोन आठवड्यात इंधनात ९.२० रुपयांची दरवाढ. पाकिटमार भाजपा सरकार, असे पटोले म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- कोरोनाच्या “या” नव्या व्हेरिएंटबाबत चिंता करायची गरज नाही – राजेश टोपे
- “मोदींनी देश उद्ध्वस्त…”, महागाईवरून नाना पटोलेंचे टीकास्त्र
- “किरीटजी पत्रकार परिषदेतून पळून गेले, देशद्रोही…”, संजय राऊतांचे टीकास्त्र
- “२५ वर्ष मराठी माणसाच्या नावावर…”, निलेश राणेंचा शिवसेनेवर निशाणा
- “मविआ सरकारने संजय राऊतांना स्वातंत्र्यसैनिक घोषित करून…”, भातखळकरांचे टीकास्त्र


