मुंबई : आरोग्य भरती घोटाळा, पेपर फुटी प्रकरण समोर आल्यानंतर विरोधकांनी आणि विद्यार्थ्यांनी महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली होती. त्यानंतर काल(१२ डिसें.) राज्यातील म्हाडाच्या परिक्षा ऐनवेळी रद्द झाल्याने पुन्हा एकदा राज्य सरकारचा ढिसाळ कारभार समोर आला आहे. म्हाडा परिक्षा रद्द झाली असल्याची घोषणा राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मध्यरात्री २ वाजता केली होती. दरम्यान, याप्रकरणी भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.
यासंदर्भात ट्विट करत उपाध्ये म्हणाले की,’आरोग्य खात्याच्या परीक्षांचा बोजवारा उडाला, आता गृहनिर्माण खाते त्यांचा कित्ता गिरवत आहे. भ्रष्टाचाराची लक्तरे वेशीवर टांगली जात असताना मुख्यमंत्र्यांनी मौन पाळले आहे. माफी मागणाऱ्या नवाब मलिकांचे गुडगोईंग म्हणून कौतुक करणारे मुख्यमंत्री आव्हाड आणि टोपेंबाबत पक्षपात करत आहेत काय?’, असा सवालही त्यांनी केला आहे.
आरोग्य खात्याच्या परीक्षांचा बोजवारा उडाला, आता गृहनिर्माण खाते त्यांचा कित्ता गिरवत आहे. भ्रष्टाचाराची लक्तरे वेशीवर टांगली जात असताना मुख्यमंत्र्यांनी मौन पाळले आहे. माफी मागणाऱ्या नवाब मलिकांचे गुडगोईंग म्हणून कौतुक करणारे मुख्यमंत्री आव्हाड आणि टोपेंबाबत पक्षपात करत आहेत काय?
— Keshav Upadhye (@keshavupadhye) December 13, 2021
दरम्यान, म्हाडा परीक्षा रद्द केल्यामुळे विद्यार्थ्यांना झालेल्या मनस्तापाबद्दल जितेंद्र आव्हाडांनी माफी मागत परीक्षेची फी परत करण्याची घोषणा केली आहे. या पेपर फुटी प्रकरणामध्ये २ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, पोलिसांनी त्या टोळीचा पर्दाफाश केला, अशी माहिती जितेंद्र आव्हाडांनी दिली आहे. भविष्याच्या दृष्टीने महाराष्ट्रात जी टोळी कार्यरत आहे, ती उध्वस्त करायला लागेल, यात पेपरफुटी नाही तर गोपनियतेचा भंग झाला आहे, असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘…ही संकटाची चाहूल तर नाही ना , याकडे डोळ्यात तेल घालून लक्ष द्यावेच लागेल’
- भाजप कार्यकर्त्यांविषयी केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावरून; राऊतांविरोधात दिल्लीत तक्रार दाखल
- सचिन सावंत यांनी ट्विट करत भाजपाला सांगितला राऊतांनी उच्चारलेल्या ‘त्या’ शब्दाचा अर्थ
- ‘आव्हाडसाहेब, जमत नसेल तर मंत्रिपद सोडा, कुंपणच शेत खात असेल तर….’
- गरिबातल्या गरीब फाटक्यातल्या फाटक्या माणसापर्यंत गोपीनाथ गड पोहोचवण्याचा संकल्प! पंकजा मुंडेंचे समर्थकांना आवाहन


