🕒 1 min read
नवी-दिल्ली : काही दिवसांपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांसाठी(Sharad Pawar) खूर्ची उचलून आणतानाचा एक फोटो व्हायरल झाला होता. तद्पश्चात या फोटोवरुन प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना राऊतांनी भाजप कार्यकर्त्यांविषयी अपशब्दांचा वापर केला होता. त्यानंतर आता भाजपच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय सचिव दीप्ती रावत यांनी दिल्लीमध्ये राऊतांविरोधात तक्रार दाखल केली असून संजय राऊत यांनी माफी मागावी, अशी मागणीही दीप्ती रावत यांनी केली आहे. दरम्यान, या तक्रारी संदर्भात राऊतांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला आहे.
यावेळी बोलत असतांना राऊत म्हणाले की,’मी जो शब्द वापरला आहे त्याचा अर्थ मूर्ख होतो. देशाच्या सर्व शब्दकोशांमध्ये त्याचा अर्थ दिला आहे. त्या शब्दकोशांना सरकारची मान्यता असून मोठ्या मोठ्या लोकांनी त्या शब्दावर आपले मत व्यक्त केले आहे. दिल्लीत माझ्याविरुद्ध एक तक्रार दाखल करण्यात आली आहे. सूडाच्या भावनेने माझा आवाज दाबण्यासाठी हे केले आहे. सीबीआय, ईडी आतापर्यंत माझ्यापर्यंत पोहोचलेले नाहीत कारण मी सरळ माणूस आहे. मला त्रास देण्यासाठी आणि माझ्या पक्षाची बदनामी करण्यासाठी ही तक्रार करण्यात आली आहे’,असे राऊत म्हणाले.
दरम्यान, राज्यसभेतील निलंबीत खासदारांचे संसदेसमोर धरणे आंदोलन सुरु असतांना या आंदोलनाला ७ डिसें.रोजी शरद पवारांनी भेट दिली. यावेळी संजय राऊत शरद पवारांसाठी खूर्ची उचलून आणतानाचा एक फोटो व्हायरल झाला होता. त्यानंतर या फोटोवरुन विरोधकांकडून टीकास्त्रांचा वर्षाव होत असतांनाच राऊतांनी याविषयी संतप्त प्रतिक्रिया दिली होती. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हेच आमचे गुरू आहेत. त्यांनीच मला हा संस्कार दिला आहे. यशवंतराव चव्हाण आमचे आदर्श आहेत. प्रत्येक ठिकाणी राजकारण चालत नाही. ही चुXXगिरी बंद करा. अशाने तुमचं महाराष्ट्रात कधीच राज्य येणार नाही. ही विकृती आहे. तुमच्या डोक्यातील हा कचरा तुम्ही साफ केला नाही, तर एखाद्या डंपिंगमध्ये लोकं तुम्हाला गाडून टाकतील,हे तुम्हाला मी आता सांगतो. पवारांसारख्या उंचीचे लोकं देशात आहे. त्यांना खुर्ची देणं यात काही वावगं नाही. हे तुम्हाला कळत नसेल तर तुम्हाला फुले-आंबेडकरांचं नाव घेण्याचा अधिकार नाही, असे राऊत म्हणाले होते.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘…ही संकटाची चाहूल तर नाही ना , याकडे डोळ्यात तेल घालून लक्ष द्यावेच लागेल’
- भाजप कार्यकर्त्यांविषयी केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावरून; राऊतांविरोधात दिल्लीत तक्रार दाखल
- सचिन सावंत यांनी ट्विट करत भाजपाला सांगितला राऊतांनी उच्चारलेल्या ‘त्या’ शब्दाचा अर्थ
- ‘मलिकांचे गुडगोईंग म्हणून कौतुक करणारे मुख्यमंत्री आव्हाड आणि टोपेंबाबत पक्षपात करत आहेत का?’
- गरिबातल्या गरीब फाटक्यातल्या फाटक्या माणसापर्यंत गोपीनाथ गड पोहोचवण्याचा संकल्प! पंकजा मुंडेंचे समर्थकांना आवाहन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
