🕒 1 min read
मुंबई : गत दोन वर्षांपासून कोरोनामुळे(Corona) जनजीवन विस्कळीत झाले होते ते पूर्वपदावर येत असतानाच आता कोरोनाच्या नव्या विषाणुने संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे. दक्षिण अफ्रिकेत आढळलेल्या ‘ओमायक्रॉन’(Omicron) हा विषाणू जास्त वेगाने फैलावणारा असल्याने अनेक देशांनी धास्ती घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी याविषयी आपल्या सामना अग्रलेखातून भाष्य केले आहे.
लेखात राऊत म्हणाले आहेत की, देशातील काही राज्यांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असतानाच जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या ओमायक्रोन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटनेही देशात आता हातपाय पसरायला सुरुवात केली आहे . ओमायक्रोनचा विषाणू घातक नसला तरी त्याची वहन आणि संक्रमणशक्ती अधिक असल्यामुळे हिंदुस्थानात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका अजूनही कायम असल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे . त्यातच देशातील १० राज्यांमधील २७ जिल्ह्यांमध्ये झपाटय़ाने वाढत चाललेली कोरोनाची रुग्णसंख्या म्हणजे तिसऱ्या लाटेच्या संकटाची चाहूल तर नाही ना , याकडे डोळ्यात तेल घालून लक्ष द्यावेच लागेल. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका टळला आहे असे वाटत असतानाच देशातील दहा राज्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागल्याने सरकारी यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या आहेत.
पुढे ते म्हणाले की,’देशावर आधीच ओमायक्रोनच्या नवीन विषाणूचे संकट घोंघावते आहे. त्यात आधीपासूनच ठाण मांडून बसलेल्या कोरोनाच्या विषाणूने काही राज्यांमध्ये पुन्हा उसळी घेणे, हे काही चांगले लक्षण नाही. आता कोरोना कुठंय? तो तर संपला, अशा समजुतीने कोरोनाचे सर्व निर्बंध झुगारून सुशेगात झालेल्या सर्वांनीच केंद्र सरकारकडून आलेला ताजा इशारा समजून घेतला पाहिजे. ज्या दहा राज्यांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढते आहे, तिथे पुन्हा एकदा पूर्वीसारखे कठोर निर्बंध लादावे लागतील, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. केरळ, मिझोराम, अरुणाचल प्रदेश, पुद्दुचेरी, मणिपूर, पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि नागालँड या राज्यांमधील १९ जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट सातत्याने वाढतो आहे. सिक्कीम, केरळ आणि मिझोराममधील आठ जिल्ह्यांमध्ये तर कोविड संक्रमणाचा दर १० टक्क्यांहून अधिक झाला आहे. देशातील या २७ जिल्ह्यांमध्ये वाढणारा कोरोना रुग्णसंख्येचा आलेख ही धोक्याची घंटाच म्हणावी लागेल. १० राज्यांतील काही जिल्ह्यांमध्ये वाढत चाललेल्या रुग्णसंख्येचे लोण शेजारच्या जिल्ह्यांमध्ये आणि तेथून लगतच्या राज्यांमध्ये पसरले तर पुन्हा एकदा कोरोनाचा प्रकोप होण्यासारखी स्थिती उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान, देशातील काही राज्यांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असतानाच जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या ओमायक्रोन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटनेही देशात आता हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. कर्नाटक, महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, दिल्लीपाठोपाठ रविवारी चंदिगड आणि आंध्र प्रदेशातही ओमायक्रोनचे रुग्ण सापडले. आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या या विषाणूचे देशभरात ३५ रुग्ण आढळले असले तरी यापैकी कुणाचीही प्रकृती फारशी खालावलेली नाही, ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब आहे. ओमायक्रोनचा विषाणू घातक नसला तरी त्याची वहन आणि संक्रमणशक्ती अधिक असल्यामुळे हिंदुस्थानात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका अजूनही कायम असल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. त्यातच देशातील १० राज्यांमधील २७ जिल्ह्यांमध्ये झपाटय़ाने वाढत चाललेली कोरोनाची रुग्णसंख्या म्हणजे तिसऱ्या लाटेच्या संकटाची चाहूल तर नाही ना, याकडे डोळ्यात तेल घालून लक्ष द्यावेच लागेल’, असे राऊत लेखाच्या शेवटी म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- म्हाडा पेपरफुटीची सीबीआय चौकशी करा; फडणवीसांची मागणी
- ‘पवारसाहेबांचे नाव घेतल्याशिवाय देशाचा आणि राज्याचा इतिहास लिहिता येणार नाही’
- जितेंद्र आव्हाडांचा विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न; केली महत्वाची घोषणा
- ‘आव्हाडसाहेब, जमत नसेल तर मंत्रिपद सोडा, कुंपणच शेत खात असेल तर….’
- गरिबातल्या गरीब फाटक्यातल्या फाटक्या माणसापर्यंत गोपीनाथ गड पोहोचवण्याचा संकल्प! पंकजा मुंडेंचे समर्थकांना आवाहन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
