Share

Atul Bhatkhalkar | प्रक्षोभक भाषणाप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर सुषमा अंधारेंनी दिलेल्या ‘त्या’ प्रतिक्रियेवर भातखळकर म्हणाले…

Published On: 

मुंबई : शिवसेनेच्या नेत्यांनी ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे झालेल्या कार्यक्रमावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. काही नेत्यांनी नरेंद्र मोदींची नक्कल देखील केली. याप्रकरणी शिवसेना पक्षातील काही नेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये शिवसेना नेते विनायक राऊत, भास्कर जाधव आणि सुषमा अंधारे यांचा समावेश आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर सुषमा अंधारे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी केलेल्या वक्तव्यावरून भाजप पक्षाचे नेते अतुल भातखळकर यांनी सुषमा अंधारे यांच्यावर हल्ला केला आहे.

काय म्हणाले अतुल भातखळकर ?

सुषमा अंंधारे यांनी प्रभू रामचंद्र आणि श्रीकृष्णावरही टीका केलेली असून, त्यांचा सुद्धा अत्यंत गलिच्छ भाषेत उल्लेख केला आहे. त्यामुळे सुषमा अंधारे यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तो कायद्याप्रमाणे नसेल असं ज्यांचं म्हणणं असेल, त्यांनी कोर्टात जावं. पण अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बोलावं?. शिवसेना पक्षाने अडीच वर्षात किती पत्रकारांवर एफआयर दाखल केले किती जणांना अटक केली?, असा सवालही भातखळकरांनी याठिकाणी केला आहे.
अतुल भातखळकर एका वृत्तवाहिनीशी संवाद साधत होते. त्यावेळी ते बोलत होते.त्यामुळे उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल किंवा काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असतील, यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बोलू नये, असं म्हणत अतुल भातखळकरांनी विरोधकांना लक्ष्य केलं आहे. पुढे बोलताना ते असंही म्हणाले की, देशातील सर्वात भ्रष्टाचारी, हुकूमशाही प्रवृत्तीचे जर कोण असतील, तर हे महाभकास आघाडीचे लोक आहेत.

सुषमा अंधारे यांची प्रतिक्रिया 

दरम्यान, सत्य मांडणे हा जर गुन्हा असेल तर तो गुन्हा आम्हाला मान्य आहे, आणि तो आम्ही करणारच सुषमा अंधारे म्हणाल्या. ज्यादिवशी चिन्ह गोठवण्याची बातमी आली त्यादिवशी महाप्रबोधन यात्रेची सुरुवात झाली. त्यामुळे ठाण्यात झालेली गर्दी ही विरोधकांच्या डोळ्यात खुपली असेल. मला नोटीस आली तर पोलीस स्टेशनला हजर होईन. कायदा माझ्या बापानं लिहिला आहे. त्यामुळे त्याचा आदर मी करणार, असल्याचं देखील त्या म्हणाल्या होत्या.
महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!