मुंबई : अंधेरी (पूर्व) पोट निवडणुकीसाठी शिवसेना पक्षाचे नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठावून निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाला आणि एकनाथ शिंदे गटाला चिन्ह आणि नाव दिले आहेत. त्यामध्ये ठाकरे गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ नाव आणि ‘मशाल’ हे चिन्ह दिलंय. याच पार्श्वभूमीवर उरणमधील शिवसैनिक मशाल घेऊन आज मातोश्री बंगल्यावर दाखल झाले.त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी एक वक्तव्य केलं. त्यावरून भाजप पक्षाचे नेते अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंवर हल्ला केला आहे.
काय म्हणाले अतुल भातखळकर ?
फरक पडायला शिल्लक तरी काय राहिलंय तुमच्याकडे?, असा खोचक सवाल करत अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. अतुल भातखळकरांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. आता केवळ 15 आमदार राहिले आहेत त्यापेक्षा कितीतरी अधिक आमदारांनी उठाव केला मात्र त्याचही उद्धव ठाकरेंना काहीच वाटलं नाही.
त्यामुळे तुम्ही घरात बसून रहा. पूर्वीही घरात बसून होते. त्यांनी आताही घरात बसून राहावं घरात बसून राहणाऱ्या माणसांना वादळाची भीती नसते. त्यामुळे उद्धव ठाकरे यांची ही बडबड हताश आणि अहंकारी माणसाची आहे.या पलिकडे त्याला काडी इतकाही अर्थ नाही, भातखळकर यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले होते उद्धव ठाकरे ?
दरम्यान,मी शिवतीर्थावर जे बोललो तेच आज मी इथेही बोलत आहे. ही माझी भावना आहे. शिवसेना 56 वर्षांची झाली आहे. या 56 वर्षांमध्ये शिवसेनेने असे 56 जण पाहिले. मात्र ज्यांनी ज्यांनी शिवसेनेवर आघात करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यामुळे शिवसेना संपली नाही तर त्यांना गाडून शिवसेना पुढे गेली आहे, शिवसेना अधिक जोमाने उभी राहिली आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं.
महत्वाच्या बातम्या :
- Andheri By Elections | अंधेरी पोट निवडणुकीत 50 वर्षांपासून विरोधात असलेल्या ‘या’ पक्षाचा शिवसेनेला पाठिंबा
- Jayant Patil | “शिवसेना फोडण्याचे पाप भाजपचंच”, जयंत पाटलांचा हल्लाबोल
- Ramdas Athvale | “उद्धव ठाकरेंची पेटलेली मशाल विझवण्याचं काम आम्ही करणार“
- Sanjay Raut Letter | “राऊतांचं भावनिक पत्र वाचून डोळ्यात पाणी आणणऱ्या लोकांनी एकदा हा व्हिडीओ बघाच”, मनसे नेत्या कडाडल्या
- Ramdas Athawale । अंधेरी पोटनिवडणुकीत आम्ही उद्धव ठाकरेंची मशाली विझविण्याचं काम करणार – रामदास आठवले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

