Share

Andheri By Elections | अंधेरी पोट निवडणुकीत 50 वर्षांपासून विरोधात असलेल्या ‘या’ पक्षाचा शिवसेनेला पाठिंबा

Published On: 

मुंबई : अंधेरी पोट निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. या पोट निवडणुकीत उद्धव ठाकरेंना राष्ट्रवादीचा पाठींबा असेल, असं शरद पवार यांनी यापूर्वीच जाहीर केलं आहे. तर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही अंधेरी पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचा पूर्णपणे पाठिंबा शिवसेना उमेदवाराला असल्याचे घोषित केले आहे. त्यामुळे, शिवसेनेला मोठं समर्थन मिळालं आहे. अशातच ठाकरे गटाला आणखीन एका पक्षाचा पाठिंबा मिळाला असल्याचं समोर आलं आहे.

गेल्या ५० वर्षांपासून शिवसेनेच्या विरोधात असलेल्या भाकपनेही जाहीर अंधेरी पोटनिवडणुकीसाठी शिवसेना उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे. भाकपचे मुंबई सचिव कॉ. मिलिंद रानडे, कॉ. प्रकाश रेड्डी, प्रकाश नार्वेकर, बाबा सावंत, व्यापारी संघटनेचे नेते विजय दळवी आणि बबली रावत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन अंधेरी पोटनिवडणुकीतील शिवसेना उमेदवार ऋतुजा रमेश लटके यांना पाठींबा जाहीर केला, अशी माहिती समोर आली आहे.

रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. एक महिन्यानंतर त्यांना त्यांचा राजीमाना चुकीच्या पद्धतीने दिल्याचं सांगितल्याचं सांगून त्यांचा राजीनामा नाकारला गेला. त्यामुळे त्यांनी पुन्हा राजीनामा दिला. ऋतुजा लटके यांना शिंदे गटाकडून मंत्रीपदाची ऑफर देण्यात येत असून त्यांना आपल्याकडे ओढण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा ठाकरे गटाच्या शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी केला आहे.

दरम्यान, मुंबई महापालिकेत ऋतुजा लटके कार्यरत होत्या. पोटनिवडणूक लढवण्यासाठी त्यांनी आपल्या शासकीय नोकरीचा राजीनामा दिला. मात्र अदयाप त्यांचा राजीनामा स्वीकार करण्यात आलेला नाही. त्यामुळे शिवसेनेतील नेत्यांची धावपळ सुरु आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!