Share

Andheri By Elections | भाजपच्या मुरजी पटेलांचा निवडणूक अर्ज भरण्याचा कार्यक्रम ऐनवेळी झाला रद्द, राजकीय चर्चांना उधाण

Published On: 

मुंबई : अंधेरी पोट निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग येत आहे. रमेश लटके यांच्या निधनानंतर या निवडणुका होत असून त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके महाविकास आघाडीला पाठिंबा देत आहेत. त्यामुळे त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजेच मशालच्या उमेदवार होणार आहेत. मात्र, त्यांचा राजीनामा अद्याप स्वीकारला नसल्याने अडचणी वाढल्या आहेत. तर दुसरीकडे भाजपकडून उमेदवार म्हणून चर्चेत असलेल्या मुरजी पटेल यांनी मतदारसंघात जोरदार प्रचारही सुरु केला होता. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून शिंदे गटाकडून उमेदवार उतरवण्याचे संकेत दिले जात आहेत.

मुरजी पटेल हे अंधेरी पोटनिवडणूक लढवण्यावर ठाम होते. आज मुरजी पटेल त्यांचा उमेदवारी अर्ज भरायला जाणार होते. मात्र, हा कार्यक्रम काही अपरिहार्य कारणांमुळे पुढे ढकलण्यात आला आहे. आशिष शेलार आणि अन्य वरिष्ठ भाजपा नेत्यांच्या उपस्थितीत शुक्रवारी सकाळी १० वाजता मुरजी पटेल अर्ज भरण्यासाठी जातील, असं भाजपच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, ऐनवेळी मुरजी पटेल यांचा उमेदवारी अर्ज भरण्याचा कार्यक्रम पुढे ढकलल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. एक महिन्यानंतर त्यांना त्यांचा राजीमाना चुकीच्या पद्धतीने दिल्याचं सांगितल्याचं सांगून त्यांचा राजीनामा नाकारला गेला. त्यामुळे त्यांनी पुन्हा राजीनामा दिला. ऋतुजा लटके यांना शिंदे गटाकडून मंत्रीपदाची ऑफर देण्यात येत असून त्यांना आपल्याकडे ओढण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा ठाकरे गटाच्या शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी केला आहे.

गेल्या ५० वर्षांपासून शिवसेनेच्या विरोधात असलेल्या भाकपनेही जाहीर अंधेरी पोटनिवडणुकीसाठी शिवसेना उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे. भाकपचे मुंबई सचिव कॉ. मिलिंद रानडे, कॉ. प्रकाश रेड्डी, प्रकाश नार्वेकर, बाबा सावंत, व्यापारी संघटनेचे नेते विजय दळवी आणि बबली रावत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन अंधेरी पोटनिवडणुकीतील शिवसेना उमेदवार ऋतुजा रमेश लटके यांना पाठींबा जाहीर केला, अशी माहिती समोर आली आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!