Share

Atul Bhatkhalkar | गृहमंत्रीपदाबाबत अजित पवारांच्या विधानावर भातखळकरांचा खोचक टोला म्हणाले…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई :  राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. विरोधी पक्षनेते आणि सत्ताधारी पक्षनेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाची खेळी सतत पाहायला मिळतं आहे. त्याचबरोबर सध्या राज्यामध्ये सगळीकडे आगामी निवडणूकांचं वारं घुमू लागलं आहे. त्यासाठी काहींनी दौरेही करायला सुरूवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार काल पुणे दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी आपल्या मनातील एक खंत व्यक्त केली. त्यांनी केलेल्या वक्तव्यावरून भाजप पक्षाचे नेते अतुल भातखळकर यांनी अजित पवारांना लक्ष्य केलं आहे.

काय म्हणाले अतुल भातखळकर ?

यासंदर्भात अतुल भातखळकर यांनी आपल्या ट्विटर आकाऊंटवरून एक ट्विट केलं आहे. दादा, तुमच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. पण हे म्हणजे मढ्यामागून रडं असा प्रकार झाला, असं म्हणथ अतुल भातखळकरांनी अजित पवारांना चांगलाच खोचक टोला लगावला आहे.

 

अजित पवारांचे वक्तव्य –

राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर मला गृहमंत्री पद हवं होतं, असं म्हणत अजित पवार यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली. पुण्यात काल शहर कार्यकारणीच्या बैठक पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. मला उपमुख्यमंत्री बनवल्यानंतर मी वरिष्ठांकडे गृहखात्याची मागणी केली होती. मात्र, अनिल देशमुख यांना गृहमंत्री बनवण्यात आले.

त्यानंतर मी पुन्हा मागणी केली. तेव्हाही दिलीप वळसे पाटील यांना गृहमंत्री बनवण्यात आहे. कदाचित वरिष्ठांना वाटत असेल की याला गृहमंत्री बनवले तर हा आपलंही ऐकणार नाही, त्यामुळे मला गृहखातं दिलं नसेल, असं अजित पवार यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या