Share

Rohit Pawar | बाळासाहेब ठाकरेंचा ‘तो’ फोटो शेअर करत रोहित पवार म्हणाले…

Published On: 

मुंबई : काल झालेल्या सुनावणीत हाय कोर्टाने उद्धव ठाकरे यांच्या गटाला शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी दिली आहे. ही परवानगी काही अटी आणि शर्थींवर देण्यात आली आहे. शिवतीर्थावर होणाऱ्या दसरा मेळाव्याची परवानगीबाबत अनेक चर्चा सुरू होत्या, मात्र आता यासर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. या निकालानंतर पक्षनेते आप-आपली प्रतिक्रिया देत आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि जामखेड-कर्जतचे आमदार रोहित पवार यांनीही यावर वक्तव्य केलं आहे.

काय म्हणाले रोहित पवार ?

रोहित पवार यांनी उच्च न्यायालयाच्या निकालानंतर आपल्या ट्विटर आकाऊंटवरून एक फोटो पोस्ट केला आहे. तो फोटो दुसरा-तिसलरा कोणाचा नसून बाळासाहेब ठाकरे यांचा आहे. बाळासाहेब ठाकरे दसरा मेळावा घेत असल्याचं त्या फोटोमध्ये असे दिसून येतं आहे. याचबरोबर फोटो शेअर करताना रोहित पवार यांनी ‘परंपरा अबाधित राहिली.सर्व निष्ठावान शिवसैनिकांचे अभिनंदन’,असं कॅप्शनही दिलं आहे.

उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया –

हाय कोर्टाने उद्धव ठाकरे यांच्या गटाला शिवतीर्थावर घेण्यासाठी हिरवा कंदील दाखवला असून,मोठ्या संघर्षानंतर शिवतीर्थावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आवाज घुमणार हे आता स्पष्ट झाले आहे. यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आवाहन –

न्यायदेवतेवरचा आपला विश्वास सार्थ ठरलेला आहे. आता न्यायदेवतेनं आमच्यावर जो विश्वास टाकलेला आहे. त्याबद्दल मी तमाम शिवसैनिकांनी शिवसेनाप्रेमींना आणि माता-भगिनींना आवाहन करतो की, उत्साहात या वाजत गाजत या गुलाल उधळत या. पण शिस्तीनं या कुठेही आपल्या या तेजस्वी परंपरेला गालबोट लागेल असं कृत्य आपल्याकडून होऊ देऊ नका, असं म्हणत त्यांनी शिवसैनिकांना आवाहन केलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!