Share

Deepak kesarkar | “उद्धव ठाकरे हिंदुत्त्वाच्या विचारावर कायम असतील तर…”; दीपक केसरकर

Published On: 

मुंबई : शिवतीर्थावर होणाऱ्या दसरा मेळाव्याची परवानगी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला मिळणार? हा प्रश्न अनेकांना पडला होता. मात्र यावर आता न्यायालयाने निर्णय दिला आहे. काल झालेल्या सुनावणीत हाय कोर्टाने उद्धव ठाकरे यांच्या गटाला शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी दिली आहे. ही परवानगी काही अटी आणि शर्थींवर देण्यात आली आहे. अशातच या निकालानंतर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले दीपक केसरकर ?

जिथे बाळासाहेबांचे विचार असतील, तिथे शिवसैनिक ऐकायला जातील, असं म्हणत दीपक केसरकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. दीपक केसरकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. आजच्या निकालात आमच्यासाठी धक्कादायक असं काहीही नाही. जर मुळ शिवसेना कोणत्या गटाची आहे, याचा निकाल आज झाला असता, तर हे धक्कादायक असतं. या निकालातून जे लोक वेगवेगळे अर्थ काढत आहेत, ते अत्यंत चुकीचे आहे.

शिंदे गटाचा मेळावा होणार-

शिंदे गटाचा मेळावा निश्चितपणे होणार आहे. को कुठे होणार याबाबतचा निर्णय एकनाथ शिंदे घेतील. मात्र, औरंगाबाद आणि जळगावमध्ये झालेला मेळावा बघितला. तर लाखोंच्या संखेने जनता येथे आली होती. कारण बाळासाहेबांच्या विचारांसाठी केवळ एकनाथ शिंदे यांनी लढा दिला आहे.

हे बाळासाहेबांना कधीही आवडले नसते –

तसेच, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी करणे हे बाळासाहेबांना कधीही आवडले नसते. जर उद्धव ठाकरे हे हिंदुत्वाच्या विचारावर कायम असतील तर त्यांनी दसरा मेळाव्याच्या व्यासपीठावरून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसशी असलेली युती तोडली असल्याचे जाहीर करावं, अशंही दीपक केसरकरांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!