Share

Abdul Sattar | “दसरा मेळाव्याची परवानगी शिवसेनेला मिळाली कारण…”; अब्दुल सत्तार

Published On: 

🕒 1 min read

वाशिम : काल मुंबई हायकोर्टात दसरा मेळावा संदर्भात सुनावणी पार पडली. संपूर्ण राज्याच्या राजकीय वर्तुळाचं या सुनावणीकडे लक्ष लागलं होत. दादरच्या शिवाजी पार्कवर शिवसेना पक्षाचा दसरा मेळावा घेण्यासाठी ठाकरे गटाला  परवानगी मिळणार की शिंदे गटाला, अशी चर्चा राज्यभर सुरू होती. मात्र कालच्या सुनावणीमध्ये न्यायालयाने उद्धव ठाकरे यांना हिरवा दिवा दाखवून, शिवतिर्थावर दसरा मेळावा घ्यायची परवानगी दिली. यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापल आहे. शिंदे गटातील नेत्यांकडून ठाकरे गटाला लक्ष्य केलं जात आहे. अशातच न्यायालयाने ठाकरे गटाला का परवानगी दिली?, या मागचे कारण शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार यांनी सांगितले आहे.

काय म्हणाले अब्दुल सत्तार ?

उद्धव ठाकरे गटाने शिवाजी पार्क मैदान मिळावे. यासाठी आमच्या अगोदर अर्ज केला होता. त्यामुळं शिवाजीपार्क मैदान त्यांना मिळाले असल्याचं अब्दुल सत्तार यांनी सांगतिले आहे. अब्दुल सत्तार यांनी वाशिममध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. आमचाही दसरा मेळावा मुंबईतल्या ‘बिकेसी’वर होणार असून, त्याठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आवाज घुमणार आहे.

तसेच,मुंबईतील बीकेसी मैदानावर 5 तारखेला दसरा मेळावा होणार आहे. ती इतिहासात न होणारी सभा राहणार असल्याचं अब्दुल सत्तार म्हणाले. पुढे बोलताना त्यांनी सांगितले की,आम्ही सरकार सोडून बाहेर गेलो. तेव्हा मुंबईत येऊन दाखवा, असं शिवसेनेनं म्हटलं होतं. तेव्हा शिंदे साहेब म्हणत होते ह्या पोकळ धमक्या आहेत. मी ऐकला जातो राज्यपाल यांची भेट घेतो.

एकनाथ शिंदे यांनी सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवला. त्याचबरोबर शिवसेना शिंदे साहेबांची आहे. त्यांनाच धनुष्य बाण निशाणी मिळणार असल्यचं त्यांनी सांगितले. मला कुत्रा निशाणी दिली तरी मी निवडून येईल, असा विश्वासही अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!