🕒 1 min read
औरंगाबाद : महाराष्ट्र राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. यातच निवडणुकांचंही वारं घुमू लागलं असून, सगळे पक्ष आगामी निवडणुकींच्या तयारीला लागले असल्याचं दिसून येतं आहे. इतकच नाहीतर काही पक्षातील नेत्यांनी दौरे करायलाही सुरूवात केली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना एक आवाहन दिले आहे.
काय म्हणाले चंद्रकांत खैरे ?
औरंगाबाद जिल्ह्यात एकही शिवसैनिक फुटला नाही, फुटले ते गद्दार. या गद्दारांच्या छाताडावर भगवा फडकविण्यासाठी कामाला लागा, असं आवाहन चंद्रकांत खैरे यांनी शिवसैनिकांना केलं आहे. औरंगाबाद शहर युवासेना नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार संमारंभ होता, त्यावेळी ते बोलत होते. याठिकाणी युवासेना उपसचिव ऋषिकेश खैरे, जिल्हा युवा अधिकारी हनुमान शिंदे देखील उपस्थित होते.
तसेच नवनिर्वाचित पदाधिकारी जिल्हा समनव्यक दत्ता शेलार, उपजिल्हा युवाधिकारी प्रकाश धुर्वे, शहर युवधिकारी स्वप्निल दिंडोरे, आदित्य दहिवाळ, रामेश्वर कोरडे, शहर समनव्यक विशाल सानप, भागीनाथ रिठे, चिटणीस मनोज क्षीरसागर, देविदास रत्नपारखी, उपशहर चिटणीस साईनाथ थोरवे, उपशहर अधिकारी नितेश थट्टेकर, समाधान बनकर, आकाश पोळ, शुभम साळवे, सागर राऊत, किरण गायकवाड, साहिल लहाने, ऋषिकेश तोरणमल यांचा सत्कार करण्यात आला.
खैरेंचे नक्कल करत बावनकुळेंना प्रत्युत्तर –
समारंभ झाल्यानंतर खैरे यांनी प्रसारमाध्यमांशी देखील संवाद साधला. त्यावेळी त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. सुरूवातीला खैरे यांनी चंद्रशेखर बावनकुळे कसे बोलतात याची नक्कल करून दाखवली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यावर बोलायला बावनकुळे हे खूपच ज्युनियर आहेत, असं म्हणत खैरेंनी बावनकुळेंवर चांगलाच पलटवार केला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Uddhav Thackeray । “दसरा मेळाव्याला उत्साहानं या पण…”; उद्धव ठाकरेंचं शिवसैनिकांना आवाहन
- Sushma Andhare । कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण कोण करतेय?, सुषमा अंधारे यांनी स्पष्टच सांगितलं
- Upcoming Cars | या नवरात्रीला बाजारात दाखल होणार आहेत ‘या’ शानदार कार, जाणून घ्या!
- Travelling Tips | तुम्ही पहिल्यांदाच विमानाने प्रवास करणार असाल तर या टिप्स वापरून पहा, प्रवास होईल सोपा!
- Nitesh Rane | “मला वाटलं आदित्यच लग्न मुलीशी जमलं म्हणून…” ; नितेश राणेंचा खोचक टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
