Share

Chhagan Bhujbal | “दसरा मेळाव्याबाबत सुप्रीम कोर्टात वेळ घालवण्यापेक्षा तुमचा वेळ शक्ती दाखवायला घाला”

Published On: 

🕒 1 min read

नाशिक : दादरच्या शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांचा शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्या ठाकरे गटातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालला होता. परंतू काल उच्च न्यायालयात पार पडलेल्या सुनावणीमध्ये यावर निकाल देण्यात आला आहे. न्यायालयाने शिवाजी पार्कवर शिवसेना पक्षाला दसरा मेळावा घेण्याची परवानगी दिली आहे. त्यानंतर यावर बऱ्याच राजकीय नेत्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. अशातच काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले छगन भुजबळ ?

दसरा मेळाव्याबाबत प्रश्न मिटला असून उद्धव ठाकरे यांना शिवाजी पार्क बाबत परवानगी मिळायला पाहिजे असा आग्रह होता. आता शेवटी त्यांना ते मिळालं असल्याचं छगन भुजबळ यांनी म्हटलं. छगन भुजबळ यांनी नाशिक येथील भुजबळ फार्म या निवासस्थानी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले की, बीकेसी ग्राऊंड पण मोठे आहे. शिंदे गट तिकडे मेळावा घेणार आहे. कोणी इकडे घ्या कोणी तिकडे घ्या फरक पडत नाही. विषय निशाणीचा असता तर समजू शकतो तिथं मतदान असतं. पण सभेच्या जागेसाठी भांडण असायचे कारण नव्हतं.

शिंदे आणि ठाकरेंना भुजबळांचा सल्ला –

त्यामुळे दसरा मेळाव्याबाबत सुप्रीम कोर्टात वेळ घालवण्यापेक्षा तुमचा वेळ शक्ती दाखवायला घाला, असा सल्लाही भुजबळ यांनी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंना दिला असल्याचं समजतं आहे.
महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Maharashtra Marathi News Nashik Politics

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या