🕒 1 min read
पुणे : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात भेट दिली. यावेळी त्यांनी नवनीत राणा यांच्यावर निशाणा साधला आहे. अपक्ष खासदार नवनीत राणा हे जर केंद्रात प्रतिनिधित्व करत आहेत तर त्यांना माझा एक प्रश्न आहे. जेव्हा महाराष्ट्र अडचणीत होता, तेव्हा त्यांनी केंद्राकडे राज्याबाबत मदत मागितली असती तर ती लोकांच्या लक्षात आली असती. हे जे काही चाललं आहे, ते शांत महाराष्ट्र अशांत करण्याचा प्रयत्न आणि विकृत मनोवृत्ती आहे, अशी घणाघाती टीका यावेळी रुपाली चाकणकरांनी नवनीत राणांवर केली आहे.
राज्यातील ठाकरे सरकारविरोधात नवनीत राणा या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे तक्रार करणार आहेत. यावर राज्य महिला आयोगाचे अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना विचारलं असता त्या म्हणाल्या, “करोनाच्या महामारीतून आत्ताच महाराष्ट्र बाहेर आला आहे. महागाई, बेरोजगारी, अर्थव्यवस्था, शेतकरी, कष्टकऱ्यांचे प्रश्न असे खूप मोठे प्रश्न राज्याच्या समोर आहे. अनेक संकटे या राज्यात आली. विरोधकांनी महाराष्ट्र सावरण्यासाठी मदत करावी याउलट या राज्यात कसा वाद निर्माण होईल याकडे काहींचं लक्ष आहे”.
राणा दाम्पत्याला न्यायालयाकडून नोटीस –
राणा या दाम्पत्याला न्यायालयाकडून जामीन काही अटी आणि शर्थीसह जामीन मंजूर झाला आहे. राणा दाम्पत्यावर लादून दिलेल्या अटी आणि शर्थी उल्लंघन झाल्यास, त्यांचा मंजूर झालेला जामीन रद्द होऊ शकतो, असे न्यायालयाने सांगितलं होतं. आता या प्रकरणी राणा दाम्पत्याला न्यायालयाने नोटीस बजावली आहे. न्यायालयाने राणा दाम्पत्याला जामीन देताना काही अटी-शर्ती घालून दिल्या होत्या. पण या अटींचे उल्लंघन झाल्याचा दावा करत सरकारी पक्षाने न्यायालयात धाव घेतली होती. सरकारी वकील प्रदीप घरत यांनी ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर सत्र न्यायालयाने राणा दाम्पत्याला नोटीस पाठवली आहे. आम्ही तुमचा जामीन रद्द का करू नये, असे स्पष्टीकरण राणा दाम्पत्याकडून मागवण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
