मुंबई : अभिनेत्री अमिषा पटेल तिच्या अभिनयामुळे नेहमीच प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत असते. धर्मवीर चित्रपटाच्या ट्रेलरला काही दिवसांपूर्वी अमिषा पटेलने उपस्थिती लावली होती. ट्रेलर लाँच वेळी अमिषाने तिथे उपस्थित सर्वांची भेट घेतली होती. यावेळी या कार्यक्रमाला शिवसेना खासदार संजय राऊत देखील उपस्थित होते. यावेळी संजय राऊतांना पाहताच अमिषाने त्यांची गळाभेट दिली. संजय राऊत यांना खास आलिंगन दिलं.
सोशल मीडिया वर अमिषाने एक व्हिडीओ शेअर केला. त्यामध्ये संजय राऊत देखील दिसतात. मुंबईमध्ये धर्मवीर या मराठी चित्रपटाच्या ट्रेलर लाँचला कार्यक्रमास उपस्थिती लावली. चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा, असे व्हीडीओला कॅप्शन देत शेअर केला. संजय राऊत यांना टँग केले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील ट्रेलर लाँच च्या वेळी उपस्थित होते. त्याचबरोबर रितेश देशमुख आणि सलमान खान हे देखील उपस्थित होते. धर्मवीर चित्रपटाची निर्मिती झी स्टुडीओज आणि मंगेश देसाई यांच्या साहिल मोशन आर्ट्सनं यांनी केली. १३ मे ला हा चित्रपट प्रेक्षकांना पाहण्यास मिळणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

