दिल्ली : नवनीत राणा आणि रवी राणा हनुमान चालीसा वादातून जामिनावर बाहेर आल्यानंतर आज दिल्लीला गेल्या आहेत. राणा दाम्पत्य दिल्लीत जाऊन गृहमंत्री अमित शाह आणि लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांची भेट घेणार आहेत. केंद्रीय यंत्रणांच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचं रवी राणा यांनी सांगीतले. यावेळी नवनीत राणा यांनी दिल्ली विमानतळावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. माध्यमांशी बोलताना त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली.
नवनीत राणा यांनी संजय राऊत हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे पोपट आहेत असा उल्लेख केला. तसेच ठाकरे सरकारने माझ्यावर अन्याय, अत्याचार केला. माझ्यावरील अन्यायाचं उत्तर महाराष्ट्रातील जनता ठाकरे सरकारला नक्की देईल. हनुमान चालिसा म्हणणं हा जर गुन्हा असेल तर १४ दिवसच काय, १४ वर्ष तुरुंगात राहायला तयार आहे. राम आणि हनुमानाचं ठाकरे सरकारला काहीही पडलेलं नाहीये. प्रभू राम आणि हनुमानाच्या नावावर ठाकरे सरकारने माझ्यावर अन्याय केलाय. असाही आरोप नवनीत राणा यांनी केला आहे.
या पाश्वर्भूमीवर आता राणा दाम्पत्य यांनी दिल्लीची वाट पकडली आहे. या सगळ्याची तक्रार आम्ही दिल्लीत जाऊन करणार असल्याचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी सांगितले. तसेच संजय राऊत यांच्याविरोधातही तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या –


