🕒 1 min read
मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यामध्ये मुंबईत झालेल्या जाहीर सभेत मशीदीवरील भोंगे न काढल्यास तिथे हनुमान चालीसा लावू असे म्हटले होते. त्यांच्या या विधानानंतर पुणे शहर अध्यक्ष वसंत मोरे यांनी नाराजी व्यक्त केली होती. या भूमिकेमुळे वसंत मोरे यांना काही तासात शहराध्यक्ष पदावरून बाजूला करण्यात आले. त्यांच्या जागी मनसेचे गटनेते साईनाथ बाबर यांची शहराध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. आता वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांची आज (११ एप्रिल) भेट घेतली आहे.
‘शिवतीर्थ’वर पोहोचताच राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांची त्यांनी भेट घेत आपली भूमिका मांडली. तुम्ही थेट राज ठाकरे यांच्याकडे तुमचे प्रश्न का मांडले नाहीत? असा प्रश्न शर्मिला ठाकरे यांनी विचारल्याची माहिती समोर येत आहे. तसेच राज ठाकरे यांनीही वसंत मोरे यांना तोच प्रश्न विचारत नाराजी व्यक्त केली. तुला थेट माझा अॅक्सेस असताना तू माझ्याशी का बोलला नाहीस? असा प्रश्न राज ठाकरे यांनी विचारल्याचे समोर आले आहे.
दरम्यान या भेटीनंतर “मी शेवटपर्यंत मनसेमध्येच राहणार. राज ठाकरे यांनी मला उद्याच्या ठाण्यातील उत्तर सभेत बोलावले आहे. आणि मी राज ठाकरे यांना भेटून समाधानी आहे.त्यामुळे बाकी सर्व प्रश्नांची उत्तरे उद्याच्या सभेत मिळतील.”, असे वसंत मोरे यांनी म्हटले आहे. त्यामुळे वसंत मोरे नेमके कोणत्या पक्षात जाणार या चर्चांना आता पूर्णविराम मिळाल्याचे म्हटले जात आहे.
दरम्यान उद्या ठाण्यात राज ठाकरे यांची उत्तर सभा होणार आहे. यामध्ये राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मागील पाडवा मेळाव्यात त्यांनी अनेक वादग्रस्त विधाने केली होती. त्यावरून मविआ नेत्यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली होती. त्यानंतर मनसेतीलच अनेक नेत्यांनी नाराजी जाहीर केली होती. आता उद्याच्या सभेत नेमके राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांच्या नजरा असतील.
महत्वाच्या बातम्या:
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणातील संजय राठोडांना हवंय पुन्हा मंत्रिपद
पाकिस्तानच्या रस्त्यांवर ‘चौकीदार चोर है’ च्या घोषणा!
यशोमती ठाकूर यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर भातखळकरांची टीका; म्हणाले, “उद्धवजी मुख्यमंत्री नसते तर…”
“सोमय्यांच्या देशविरोधी कृत्यात भागीदार होऊ नका, अन्यथा राजभवनाची इभ्रत जाईल”; संजय राऊत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
