Share

“इश्क़ में हम तुम्हे क्या बताये…”, मोहित कंबोज यांचा मुख्यमंत्री ठाकरेंवर निशाणा

Published On: 

मुंबई: कोल्हापूर उत्तर विभानसभा पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री चंद्रकांत जाधव यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काल (१० एप्रिल) ऑनलाईन प्रचारसभा घेतली. यात त्यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर उत्तरमध्ये भाजप आणि काँग्रेसची छुपी युती झाली असल्याचा आरोप करत २०१४ आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकांमधील आकडेवारी सांगितली आणि भाजपवर निशाणा साधला. यावरच आता भाजप नेते मोहित कंबोज यांनी ट्वीट करत खोचक टोला लगावला आहे.

“देखो कौन बोल रहा है बेवफ़ाई की बात! इश्क़ में हम तुम्हे क्या बताये किस कदर चोट खाये हुए है?”, असे ट्वीट करत मोहित कंबोज यांनी मुख्यमंत्री ठाकरेंना टोला लगावला आहे. दरम्यान भाजपच्या गद्दारीमुळे कोल्हापूर सीट गमावले असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

मुख्यमंत्री ठाकरे नेमके काय म्हणाले?

२०१४ साली एकनाथ रावांचा फोन आला. आपलं जागा वाटपाचं काही जुळतं नाही, आपण स्वतंत्र लढूया. त्यावेळी शिवसेनेला ६९ हजार ७३६ मत मिळाली. तर भाजपला ४० हजार १०४ मत आणि काँग्रेसला मिळाली होती ४७ हजार ३१५ मत. मग २०१९ ला आपली युती झाली. तेव्हा आपल्याला भाजपच्या ४० हजार मतांपैकी किमान ३५ हजार, ३०, २५, २० हजार तरी मत मिळायला हवी होती. पण त्यावेळी आपल्याला ७५ हजार एकूण मत मिळाली. म्हणजे ५ ते ६ हजार मत वाढली. मग युती मधील ही भाजपची ४० हजार मत कुठे गेली? का पंचगंगेच्या दुषित पाण्यासारखी तुमच्या मतांमध्येही प्रदुषण झालं का? असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

महत्वाच्या बातम्या:

“भाजपकडून मनसेचा फक्त वापर सुरु”, जयंत पाटलांचा दावा

मोठा खुलासा! 2 महिन्यापेक्षा जास्त काळ संजय राऊतांचा फोन टॅप; चौकशी सुरू

VIDEO : “मजा येतेय का?”, मॅचमध्ये आऊट केल्यानंतर विराटला सामोरं गेला ‘BABY AB’! मग पुढं काय झालं पाहा!

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला खतपाणी कुणी घातले?; जयंत पाटलांचा सवाल

राज ठाकरेंच्या नातवाची पहिली झलक; अमित ठाकरेंची पोस्ट व्हायरल

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!