Share

IPL 2022 : युझवेंद्र चहलचा कहर..! लखनऊविरुद्धच्या सामन्यात रचला ‘नवा’ रेकॉर्ड; वाचा!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा लेगस्पिनर युझवेंद्र चहलने एक खास कामगिरी केली. त्याने आयपीएलमध्ये १५० बळी पूर्ण केले. मुंबईसाठी आयपीएल करिअरची सुरुवात करणाऱ्या चहलने बंगळुरूकडून खेळताना सर्वांना प्रभावित केले आणि आता तो राजस्थानसाठी दमदार कामगिरी करत आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत चहल संयुक्तपणे सहाव्या क्रमांकावर आहे. लखनऊविरुद्धच्या सामन्यात त्याने चार विकेट घेत ही खास कामगिरी केली आहे.

या सामन्यात चहलने चार षटकांत ४१ धावा देत चार फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. तो आपल्या संघाचा सर्वात महागडा गोलंदाज होता, पण चार महत्त्वपूर्ण विकेट घेत त्याने आपल्या संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले. याच कारणामुळे त्याला सामनावीर म्हणूनही गौरवण्यात आले.

सर्वात वेगवान १५० विकेट पूर्ण करणारा फिरकी गोलंदाज

चहलने केवळ ११८ सामन्यात १५० विकेट घेतल्या आहेत. यासह तो आयपीएलमध्ये सर्वात जलद १५० विकेट्स पूर्ण करणारा फिरकी गोलंदाज बनला आहे. या बाबतीत फक्त लसिथ मलिंगा त्याच्या पुढे आहे, ज्याने १०५ सामन्यात १५० बळी पूर्ण केले आहेत. त्याचवेळी ड्वेन ब्राव्होने १३७, अमित मिश्राने १४० आणि पीयुष चावलाने १५६ सामन्यात १५० बळी पूर्ण केले होते.

आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत चहल हरभजनसह संयुक्तपणे पाचव्या स्थानावर आहे. दोघांच्या नावावर १५० विकेट आहेत. दुसरीकडे, पीयुष चावला १५७ विकेट्ससह चौथ्या, अमित मिश्रा १६६ विकेटसह तिसऱ्या, लसिथ मलिंगा १७० विकेट्ससह दुसऱ्या आणि ड्वेन ब्राव्हो १७३ विकेट्ससह पहिल्या क्रमांकावर आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!