Share

राजकीय द्वेषापोटी भकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना वेठिला धरू नये- अतुल भातखळकर

Published On: 

मुंबई : काही दिवसांपूर्वी शेतकरी संघटनांनी पंतप्रधान पीकविमा योजनेत शेतकऱ्यांच्या अडचणी आणि कृषी विभागाची घुसमट यामुळे राज्यासाठी स्वतंत्र पीकविमा कंपनी असावी अशी मागणी राज्य कृषिमंत्री दादा भुसे(Dada Bhuse) यांच्याकडे केली होती. त्या अनुषंगाने आता कृषी विभागाने प्रस्ताव तयार केला आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या पीकविमा योजनेतून बाहेर पडण्याची प्रक्रिया सुरु झाली असून येणाऱ्याअर्थसंकल्पात अशा स्वरुपाचा प्रस्ताव हा कृषी विभागाकडून पाठविण्यात येणार आहे. दरम्यान, या मुद्द्याहून आता भाजप नेते अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे.

यासंदर्भात अतुल भातखळकर यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘महाराष्ट्र पंतप्रधान पीकविमा योजनेतून बाहेर पडणार अशी वदंता असून कृषीमंत्री दादा भुसे यांनी स्वतंत्र महाराष्ट्र पीकविमा कंपनीचा प्रस्तावाचे संकेत दिले आहेत. राजकीय द्वेषापोटी भकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना वेठिला धरू नये. हे असंविधानिक पाऊल राज्याला विनाशाच्या गर्तेत नेऊ शकते’, असे भातखळकर म्हणाले आहेत.

दरम्यान, पंतप्रधान पीकविमा योजनेमध्ये अनेक त्रुटी असून शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजनेचा लाभ होत नाही. त्यामुळे राज्य सरकारने या पीकविमा योजनेमधून बाहेर पडून स्वतंत्र योजना राबवावी अशी मागणी शेतकरी संघटनांनी कृषी विभागाच्या बैठकीत केली होती.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!