Share

सत्तेचा गैरवापर करायचाच असता तर नितेश राणे यांना रुग्णालयात नव्हे तर तुरुंगातच ठेवले असते- दीपक केसरकर

Published On: 

सिंधुदूर्ग: भाजप आमदार नितेश राणे यांना संतोष परब हल्ला प्रकरणी सिंधुदुर्ग न्यायालयाने १८ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर आज त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. त्यापूर्वीच प्रकृतीत अस्वस्थता असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यावरच शिवसेना नेते दीपक केसरकर (Shiv Sena leader Deepak Kesarkar) यांनी आम्हाला सत्तेचा गैरवापर करायचाच असता तर नितेश राणे (BJP leader Nitesh Rane) यांना रुग्णालयात नव्हे तर तुरुंगातच ठेवले असते. असे म्हटले आहे.

राजकीय सुडापोटी नितेश राणे यांच्यावर कारवाई करायीचच असती तर त्यांची रुग्णालयातही चौकशी केली असते. यावरुन आम्ही सत्तेचा वापर करतो की नाही, हे समजते. गुन्हेगारी प्रवृत्तीकडे एखादा राजकीय नेता वळतो तेव्हा त्याच्यावर यासाठीच शिक्षा करावी लागते की, तो पुन्हा अशा घटना करणार नाही. अशी प्रतिक्रिया दीपक केसरकर यांनी दिली आहे. ते सावंतवडीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत काल बोलत होते.

दरम्यान कणकवली सत्र न्यायालयाने शुक्रवारी नितेश राणे यांना १४ दिवसांची यालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर नितेश राणे यांच्या वकिलांनी तब्येत बिघडल्यामुळे नितेश राणे यांना रुग्णालयात ठेवण्यात यावे, असा अर्ज तुरुंग अधीक्षकांना पाठवला होता. त्यानुसार रात्री नितेश राणेंना जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. तर आज त्यांच्या जामीन अर्जावर सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!