Share

“सरकराच्या देशद्रोहावर बोलणे म्हणजेच ‘देशद्रोह’ असा नवा फंडा”

Published On: 

मुंबई : काँग्रेस नेते आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी(Rahul Gandhi) यांनी संसदेमध्ये केलेले भाषण सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. तसेच राहुल यांच्या भाषणावर भाजप नेत्यांकडून मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत असल्याचेही बघायला मिळत आहे. असे असतांनाच आता शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी देखील आपल्या आजच्या सामना अग्रलेखाच्या माध्यमातून याविषयी भाष्य केले आहे. तसेच त्यांनी भाजपवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षावही केला आहे.

लेखात राऊत म्हणाले आहेत की,‘देशातील जनतेचे १५ हजार कोटी रुपये मोदी सरकारने पेगॅसस स्पायवेअर खरेदी करण्यासाठी वापरले. ही उधळपट्टी म्हणजे देशद्रोह आहे, पण विरोधकांना यावर संसदेत बोलू दिले जात नाही. सरकारच्या देशद्रोहावर बोलणे म्हणजेच देशद्रोह असा नवा फंडा तयार झाला आहे. पाकिस्तान व चीन हे हिंदुस्थानविरोधात एकत्र आले आहेत हा देशाला मोठा धोका आहे. दोन दुश्मनांना एकत्र येण्याची संधी मोदी सरकारने दिली, असा दावा गांधी करतात तेव्हा त्यास आधार आहे. लडाखमध्ये चीन घुसले आहे, ते माघार घ्यायला तयार नाही. पाकिस्तानचे छुपे हल्ले संपले नाहीत व आता चीनने पाकिस्तानला उघड पाठिंबा दिला, हे आपल्यासाठी धोकादायक आहे.’

पुढे ते म्हणाले की,‘राहुल गांधी यांनी हे सर्व संसदेच्या व्यासपीठावर सांगितले व त्याबद्दल भाजपचे प्रवक्ते त्यांना चीनचे एजंट ठरवू लागले. या मूर्खपणास काय म्हणायचे! मोदी सरकारकडे विस्मरणाची कला आहे, पण सत्य ऐकून घेण्याचे इंद्रिय त्यांच्यापाशी नाही. २०१४ च्या प्रचारात दिलेली वचने सरकारच्या स्मरणात नाहीत. प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख, महागाई खतम करणार, इन्कम टॅक्स भरावा लागणार नाही. पाकव्याप्त कश्मीर पुन्हा परत आणणार, दोन कोटी बेरोजगारांना प्रत्येक वर्षी नोकऱ्या या वचनांची आठवण करून देणारे राष्ट्रद्रोही ठरवले जातात. २०१४ सालीच देश निर्माण झाला असे ज्यांना वाटते त्यांच्यासाठी राहुल गांधींनी डोक्याला शॉट दिला आहे. माझे पणजोबा पंडित नेहरू हे देशासाठी पंधरा वर्षे तुरुंगात होते. माझ्या आजीने, इंदिरा गांधींनी देशासाठी शरीरावर ३५ गोळ्या झेलल्या. माझे वडील राजीव गांधी हेसुद्धा देशासाठीच हुतात्मा झाले. तुम्ही मला काय देश शिकवता? मला माझा देश चांगला माहीत आहे, असा तीर राहुल गांधींनी सोडला व त्यामुळे सत्ताधारी घायाळ झाले.’

दरम्यान, देशासाठी बलिदान, रक्त सांडणे, त्याग वगैरे गोष्टींशी सध्याच्या दिल्लीतील राज्यकर्त्यांचा संबंध राहिलेला नाही. दोन-पाच उद्योगपतींभोवतीच देशाचे चक्र फिरते आहे. सरकार म्हणजे काय? याचा विसर पडला आहे. सीबीआय, ईडी, इन्कम टॅक्स हेच जणू मंत्रिमंडळाचे सदस्य आहेत. पुलवामा घडले ही सध्याच्या सत्ताधाऱ्यांना संरक्षण व्यवस्थेची मोठी चूक वाटत नाही. हे का घडले? असे विचारणारे पाकचे एजंट ठरविले जातात. चिनी सैन्य लडाखमध्ये का घुसले असे विचारणाऱ्यांना चीनचे एजंट ठरवणे म्हणजे राज्य करणे नव्हे. राहुल गांधी यांनी याच प्रवृत्तीवर जोरदार प्रहार केला आहे. त्यांचे टोकदार भाषण सत्ताधाऱ्यांना झोंबणारच, असेही राऊत म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!