Share

सुजित पाटकरविरुद्ध पुण्यातील जंबो कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी किरीट सोमय्या आज तक्रार दाखल करणार

Published On: 

पुणे: भाजप नेते किरीट सोमय्या ( BJP leader Kirit Somaiya) आज संजय राऊत यांचे पार्टनर सुजित पाटकरविरुद्ध(Sujit Patkar) पुण्यातील जंबो कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी तक्रार दाखल करणार आहेत. याप्रकरणी त्यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे.

“आज दुपारी ४ वाजता मी शिवाजी नगर पुणे जंबो कोविड सेंटर घोटाळ्यासाठी संजय राऊत पार्टनर सुजित पाटकर लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस विरुद्ध शिवाजी नगर पुणे पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करणार आहे. (Kirit Somaiya will file complaint against Jumbo Kovid Center scam in Pune)कोविड रुग्णांच्या मृत्यूप्रकरणी ही तक्रार मी दाखल करणार आहे. त्यांनी खोटे डॉक्युमेंट्स देऊन कॉन्ट्रॅक्ट मिळविला”, असे ट्वीट किरीट सोमय्या यांनी केले आहे.

दरम्यान राऊतांच्या मुलींच्या कंपनीत भागीदार असलेल्या सुजित पाटकर यांच्या घरावर ईडीने छापे टाकले आहेत. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पक्षासाठी आणि महाराष्ट्रासाठी तुरुंगात जायला आणि मरायलाही तयार असल्याचं म्हटले आहे. अनेक वर्षापासून माझ्याविरोधात षडयंत्र रचलं जात आहे. माझ्या कुटुंबाला त्रास दिलो जातोय. माझे नातेवाईक, माझा मित्र परिवार, माझे सहकारी यांना केंद्रीय तपास यंत्रणांद्वारे त्रास दिला जात आहे. पण त्याची पर्वा करत नाही. मी माझ्या पक्षासाठी आणि महाराष्ट्रासाठी तुरुगांत जायला आणि मरायलाही तयार आहे. मी काळजी करत नाही, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!