🕒 1 min read
मुंबई: देशात नरेंद्र मोदी यांच्यासमोर पर्याय निर्माण करायचा असेल तर शरद पवारांचीच गरज आहे. देशात विरोधकांच्या एकजुटीसाठी शरद पवार यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटले होते. यावरच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ३०१ खासदार निवडून आणणाऱ्या मोदीजींसमोर हे संजय राऊत शरद पवारांचा पर्याय दाखवत असल्याचे म्हणत उद्धव ठाकरे यांना सावध राहण्याचा सल्ला दिला होता. आता राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी यावर ट्वीट करत चंद्रकांत पाटलांना (Chandrakant Patil) प्रत्युत्तर दिले आहे.
“तुमच्या पासुन ते केव्हाच सावध झालेत. पवार साहेब काय आहेत हे एकदा मोदीजींना विचारा.(तुम्हाला भेटीचा वेळ दिला तरच) नाहीतर दिल्लीत तुमच्याच पक्षाची लोकं तुमची कशी खिल्ली उडवतात हे आज प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलंय. तुम्हाला काही किंमत नाही इकडे..”, असा टोला अमोल मिटकरी यांनी ट्वीट करत लगावला आहे.
चंद्रकांत पाटील काय म्हणाले होते?
“३०१ खासदार निवडून आणणाऱ्या मोदीजींसमोर हे संजय राऊत शरद पवारांचा पर्याय दाखवत आहेत. सत्तेचा मोह इतका वाढला आहे की, आपण धनुष्याच्या बाणात आहोत की घड्याळाच्या काट्यात याचाच यांना विसर पडला आहे. रोज सकाळी उठून शरद पवारांचं नामस्मरण सुरूच आहे. उद्धवजी,(Uddhav Thackeray) पुन्हा सांगतो,सावध राहा!”, असे ट्वीट करत चंद्रकांत पाटील यांनी टोला लगावला होता.
संजय राऊत काय म्हणाले होते?
शरद पवार खूप मोठे नेते आहेत. आम्ही सर्वच त्यांचा आदर आणि सन्मान करतो. देशातील विरोधी पक्षांना एका सक्षम नेतृत्वाची गरज आहे. सर्व भाजपविरोधी पक्ष एकत्र यावेत, यासाठी हालचाली सुरू आहेत आणि शरद पवारांच्या पुढाकाराशिवाय या एकजुटीचे पाऊल पुढे जाणार नाही, हे आम्हाला सर्वांना माहिती आहे. शरद पवार यांचे मार्गदर्शन आम्हाला लाभत असते. शरद पवार यांच्याशिवाय मोदींना पर्याय आणि सक्षम विरोधी पक्ष तयार होऊ शकत नाही, असे माझे स्पष्ट मत आहे. देशामध्ये अनेक मोठे नेते आणि ते नेतृत्व करण्यासाठी सक्षम आहेत. मात्र, या सर्व नेत्यांना एकत्र आणण्यासाठी शरद पवार यांनी पुढे यावे. असे संजय राऊत यांनी म्हटले होते.
महत्वाच्या बातम्या:
“लाव रे तो व्हिडीओ आणि आता …”, जितेंद्र आव्हाडांचा राज ठाकरेंना जोरदार टोला
“अशा नतद्रष्टांच्या छाताडावर पाय ठेवून…”; संजय राऊतांचा भाजपवर निशाणा
बाळासाहेबांनी मराठी भाषा व अस्मितेच्या रक्षणासाठीच शिवसेना काढली- संजय राऊत
“अजान सुरु झाली अन् गृहमंत्र्यांनी थांबवले भाषण”, व्हिडीओ व्हायरल
“मर्दानी मराठी भाषेचे भवन उभे राहतेय यात अडथळा आणाल तर…”, शिवसेनेचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
