पुणे : २ एप्रिल रोजी गुढीपाडव्यानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची शिवाजी पार्कमध्ये जाहीर सभा झाली. यावेळी बोलत असतांना राज ठाकरेंनी वेगवेगळ्या मुद्द्यांवरून शिवसेना आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला. तसेच कोणत्याही धर्माच्या प्रार्थनेला माझा विरोध नाही, पण मशिदीवरील भोंगे खाली उतरावेच लागतील, जर भोंगा दिसलाच तर त्याच्या समोर दुप्पट स्पीकर लावून हनुमान चालिसा लावणार, असा इशाराही ठाकरेंनी यावेळी दिला. या मुद्द्यावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात झाल्याचे बघायला मिळत आहे. असे असतांनाच आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse Patil) यांचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हा व्हिडीओ शिरुर येथील असून व्हिडिओमध्ये एका जाहीरसभे दरम्यान भाषण देत असतांना शेजारच्या मशीदीमधून अजान सुरु झाली. त्यानंतर भाषण देत असणाऱ्या दिलीप वळसे-पाटलांनी भाषण थांबवले आणि ते काही वेळ तसेच उभे राहिले. तसेच अजान संपल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा भाषणाला सुरुवात केली. सध्या रमजानचा महिना सुरु असून या पार्श्वभुमीवर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.
दरम्यान, काल (४ एप्रिल) मशिदीवरील भोंग्यां संदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना दिलीप वळसे-पाटील म्हणाले होते की,‘प्रत्येकाने आपल्या मर्यादा पाळायला हव्या. अजानचे भोंगे लावायचे आहेत त्यांनी डेसिबलची मर्यादा पाळली पाहिजे. ज्यांना हनुमान चालिसा लावायची आहे त्यांनीही जरुर लावावी पण तिकडे अजान होत असते त्याचवेळी लावू नये.’ तसेच अजानचा भोंगा आहे म्हणून हनुमान चालिसा लावू हा काही विकासाचा मुद्दा होऊ शकत नाही.’
महत्वाच्या बातम्या:
- IPL 2022 : ये दर्द तुम नही समझोगे..! विराटनं सांगितल्या ‘त्या’ दोन सामन्यांच्या कटू आठवणी; पाहा VIDEO
- “मी स्वत: मागासवर्गीय समाजातून…”, राज ठाकरेंच्या टीकेवर जितेंद्र आव्हाडांचे प्रत्युत्तर
- मनसेचा हनुमान चालीसा कार्यक्रम पोलिसांकडून रद्द!
- उद्धवजी पुन्हा सांगतो सावध राहा! राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्यावर चंद्रकांत पाटलांचा सल्ला
- “शरद पवारांचे नाव घेतल्याशिवाय हेडलाईन बनणार नाही, म्हणून…”, जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल


