Share

भारीच ना..! पुन्हा रंगणार भारत-पाकिस्तान महामुकाबला; वर्ल्डकपपूर्वी ‘या’ स्पर्धेची झाली घोषणा!

Published On: 

मुंबई : आशियाई क्रिकेट परिषदेने आशिया चषक २०२२च्या तारखा जाहीर केल्या आहेत. श्रीलंका या स्पर्धेचे यजमानपद भूषवणार आहे. स्पर्धेतील पहिला सामना २७ ऑगस्ट रोजी होणार असून अंतिम सामना ११ सप्टेंबर रोजी होणार आहे. आशियाई क्रिकेट परिषदेने ट्वीट करून स्पर्धेच्या तारखांची माहिती दिली. ही स्पर्धा टी-२० फॉरमॅटमध्ये खेळवली जाईल. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातही रंजक सामना पाहायला मिळणार आहे. टीम इंडिया हा आशिया कपच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहे.

आतापर्यंत ही स्पर्धा १४ वेळा आयोजित करण्यात आली आहे. १९८४मध्ये ही स्पर्धा पहिल्यांदा आयोजित करण्यात आली होती. भारतीय संघ १९८४, १९८८, १९९०-९१, १९९५, २०१०, २०१६ आणि २०१८मध्ये चॅम्पियन ठरला आहे. त्याचवेळी श्रीलंकेने १९८६, १९९७, २००४, २००८ आणि २०१४ मध्ये विजेतेपद पटकावले होते. पाकिस्तानने २००० आणि २०१२ मध्ये ही स्पर्धा जिंकली आहे.

सहा संघांच्या या स्पर्धेत आशिया खंडातील पाच संघांना थेट प्रवेश मिळाला आहे. हे संघ भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान आहेत, तर सहावा संघ क्वालिफायर सामन्यांच्या आधारे निश्चित केला जाईल. आशियाई क्रिकेट काऊन्सिलच्या (ACC) बैठकीत २०२४ पर्यंत जय शाह हे एसीसीचे अध्यक्ष राहतील असा निर्णयही घेण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!