Share

“370 कलम हटवणारी भाजप आहे,…” – देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेवर हल्लाबोल

Published On: 

पुणे : कालपासून एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या महाविकास आघाडीच्या प्रस्तावावरून राजकारण तापलेलं पाहायला मिळत आहे. भाजपने शिवसेनेला पुन्हा हिंदुत्वावरून डिवचायला सुरु केले आहे.

विरोधी पक्षनेतेही देवेंद्र फडणवीस यांनी कालपासून शिवसेनेवर या मुद्द्यावरुन जोरदार हल्लाबोल सुरु केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचा उल्लेख लाचार म्हणून केला आहे. म्हणाले, “शिवसेनेची लाचारी 2019 ला दिसली, मोदींचा फोटो लावून निवडणुका जिंकली, असा जोरदार घणाघात शिवसेनेवर केला गेला.

तसेच पुढे फडणवीस म्हणाले, “शिवसेनेने एमआयएमसोबत जावं किंवा नाही तो त्यांचा प्रश्न आहे. पण त्यांचे लोकं आज जनाब बाळासाहेब ठाकरे बोलत आहेत, अजान स्पर्धा घेत आहेत. राष्ट्रीय प्रश्नावर ते मोदींना विरोध करत आहेत, पण 370 कलम हटवलं तेव्हा संपूर्ण देश एक होता, तेव्हा हे विरोध करत होते. त्यांना इतिहास माहिती नाहीये, 370 कलम हटवणारी भाजप आहे, राम मंदिर बांधणारी भाजप आहे, लाल चौकात तिरंगा लावायला शिवसेना नव्हती गेली भाजप गेली होती, असे म्हणत त्यांनी शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!