Share

रामदास आठवलेंनी केली AIMIM साठी खास कविता; म्हणाले…

Published On: 

मुंबई: एमआयएम चे खासदार इम्तियाझ जलील यांनी महाविकास आघाडीत सामील होण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्यावरून राजकीय वर्तुळात चर्चा आणि आरोपांना उधाण आले आहे. यातच आता केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी देखील याप्रकरणावर भाष्य केले आहे. रामदास आठवले यांनी त्यांच्या खास शैलीतील कविता ट्विट करत एमआयएमला खोचक शब्दात सल्ला दिला आहे.

”एमआयएमची आहे हार्डलाईन, त्यामुळे सर्वांनी केले आहे त्यांना साईडलाईन. एमआयएमशी कोणी युती करीत नसेल तर त्यांनी एकट्याच्या बळावर लढावे.” असे ट्विट आठवलेंनी केले आहे. या ट्विटची सर्वत्र चर्चा रंगली आहे.

“AIMIM कडून आलेली ऑफर भाजपच्या कटाचा भाग”- संजय राऊत

“मुख्यमंत्र्यांनी आज सांगितल्यानुसार शिवसेना एक प्रखर हिंदुत्ववादी पक्ष आहे आणि राहणार. शिवसेना कधीही हिंदुत्वाशी या प्रकारची तडजोड करणार नाही. एमआयएमकडून आलेली फुकटची ऑफर भाजपच्या व्यापक कटाचा भाग आहे. राजकीय शत्रूला बदनाम करण्यासाठी त्यांचं हे एक मोठे षडयंत्र आहे. लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करायचा. हा त्याच कटाचा भाग आहे. त्यानुसार त्यांनी एमआयएमच्या लोकांना आमची बदनामी करण्यासाठी सोडले आहे. मात्र, या संदर्भात शिवसेना सावध आहे, महाराष्ट्राची जनता सावध आहे आणि शिवसेनेने हा व्यापक कट उधळून लावला आहे”. अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी माध्यमांशी बोलताना दिली.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!