🕒 1 min read
रत्नागिरी : राज्यात शिंदे फडणवीस सरकार सत्तेत येताच पुन्हा एकदा रत्नागिरीतील रिफायनरी प्रकल्पाचं काम सुरू करण्यात आलं आहे. त्यासंदर्भात रत्नागिरीतील बारसू गावात गेल्या दोन दिवसांपासून सर्व्हे सुरू करण्यात आला आहे. सर्व्हे सुरू असलेल्या या जागेची आज भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांनी पाहणी केली. पाहणी झाल्यानंतर परतत असताना मात्र ग्रामस्थांनी राणेंच्या गाडीचा ताफा अडवला. तिथे उपस्थित महिला आंदोलकांनी निलेश राणे यांना जाब विचारत ठिय्या आंदोलन सुरू केलं. हे आंदोलक राणेंचं काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे काही वेळ वातावरण तापलं होतं.
तिथे उपस्थित आंदोलकांना राणे म्हणाले कि, “मी स्वतः तिथे येतो. आपण बसून बोलू. आपण चर्चेतून मार्ग काढू. तुमचा विरोध हा देशभरात पोहचला आहे. तुम्ही किती वेळ बसून राहणार. त्यापेक्षा आपण बोलून मार्ग काढू. तुमचं म्हणणं सरकारपुढे मांडू.” मात्र आम्ही इथे सर्व्हेही होऊ देणार नाही आणि रिफायनरी प्रकल्प रद्द केल्याशिवाय आम्ही स्वतः बसणार नाही. तो प्रकल्प आमच्या गावात होता कामा नये, असं तेथील आंदोलकांचं म्हणणं आहे. यावेळी महिला जास्त आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. आंदोलकांनी निलेश राणेंविरोधातही घोषणाबाजी केली.
महत्वाच्या बातम्या:
- Amravati । अमरावतीत आज देवेंद्र फडणवीस यांची रक्ततुला होणार, आमदार रवी राणा यांच्यावतीने आयोजन
- उद्या कोर्टात काय व्हायचं ते होईल, माझा न्यायदेवतेवर विश्वास- उद्धव ठाकरे
- Eknath Shinde | मुंबईवर हल्ला करण्याची कोणी हिम्मत करणार नाही- एकनाथ शिंदे
- Uddhav Thackeray | आमच्याकडेही खोके येत आहेत मात्र आमच्या खोक्यांमध्ये निष्ठा आहे – उद्धव ठाकरे
- Vinayak raut | “महाराष्ट्रातील संपूर्ण वंचित बहुजन आघाडी पक्ष शिवसेनेत येणाच्या मानसिकतेत”; विनायक राऊतांचा दावा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
