Share

Sanjay Shirsat | अतुल सावे मागून आले अन् मंत्री झाले, आता आमच्याकडे पण पहा जरा – संजय शिरसाठ

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : तब्बल ३८ दिवस रखडलेला राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार अखेर झाला. शिंदे गटातील आणि भाजपमधील अनेक मंत्र्यांना आशा होती कि त्यांना मंत्रिपद नक्की मिळणार. पण या आशेवर असलेल्या मंत्र्यांना आशेवरच राहण्याची वेळ आली. कारण पहिल्या टप्प्यात केवळ १८ मंत्र्यांना मंत्रिपद देण्यात आलं. त्यामुळे अनेक आमदार नाराज झालेले पाहायला मिळत आहेत आणि नाराज आमदारांची नाराजी वेळोवेळी समोर येत आहे. आज असंच काहीस वक्तव्य आमदार संजय शिरसाठ यांनी देखील अतुल सावे यांचा उल्लेख करत केलं आहे.

संजय शिरसाठ हे त्यांच्या मतदारसंघातील रस्त्याच्या कामाच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते. “मंत्री अतुल सावे यांच्या वडिलांसोबत मी काम केलं आहे. तेव्हा कधी वाटलंही नव्हतं कि ते राजकारणात येतील. मात्र अतुल सावे आमच्या मागून आले काय, राज्य मंत्री झाले काय, कॅबिनेट मंत्री झाले काय… मात्र आता आमच्याकडे पण पहा जरा. आजकाल सिनियरीटीचं काही राहिलेलंच नाहीये, असं वाटतंय.”, असे म्हणत संजय शिरसाठ यांनी मंत्री पद न दिल्याने नाराजी बोलून दाखवली. तसेच ते असंही म्हणाले कि, “सध्या प्रत्येक जण एकमेकांवर टीका करत आहेत. मी तर माझं काहीच नसतानाही टीव्हीवर दिसत राहतो. पण माणसाचं महत्व हे कधी एकमेकांवर टीका करून वाढत नाही. तुम्ही काम केलंत तरच तुमचं महत्व वाढणार आहे.”

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!