🕒 1 min read
मुंबई : पाचही राज्यांचे निकाल जवळपास स्पष्ट होताना दिसत आहे. गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपाला आघाडी मिळाली आहे. आतापर्यंतच्या निकालानुसार भाजप गोव्यात 20 जागांवर आघाडीवर आहे. तर तीन अपक्ष आणि अन्य स्थानिक पक्षांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे गोव्यात भाजपची सत्ता येण्याची दाट शक्यता आहे. भाजपला आव्हान देण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसही रिंगणात उतरले होते. परंतु त्यांना यश मिळाले नाही. दुसरीकडे भाजपचा विजय साजरा करण्यासाठी मुंबईत जय्यत तयारी सुरु आहे. त्यासाठी भाजपचे अनेक नेते भाजप कार्यालयात पोहोचले आहेत.
एकीकडे भाजप विजयाचा जल्लोष करत असतानाच भाजप नेते मात्र इतर पक्षाच्या नेत्यांवर हल्लाबोल करत आहेत. भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी यावेळी शिवसेनेवर जोरदार टीका केली. “बोरूबहाद्दर आणि युवराज गोवा-गोरखपूरमध्ये गेले. बदल आणू म्हणाले. गोरेगावमध्ये बदल करू शकले नाहीत. नोटाला जेवढी मत आहेत त्या पेक्षा कमी मत शिवसेनेला मिळाली आहेत. शिवसेनेचे डिपॉझिट जप्त झाले. लाईट गुल झाली. आता मुंबईत ही परिवर्तन होणार. यांची लाईट गुल होणार आहे. मोदी है तो मुमकीन है, मुंबईत ही चाणक्य म्हणून देवेंद्र फडणवीस काम करणार”, असे शेलार म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
