मुंबई : भाजपचे नेते आशिष शेलार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आली आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी बुधवारी मरिनड्राईव्ह पोलीस ठाण्यात आशिष शेलार यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. यावरुन आता आशिष शेलार यांनी किशोरी पेडणेकर यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे.
राज्य सरकाराचा नाकर्तेपणा आणि भ्रष्टाचार उघड केला म्हणून सत्तेचा आणि पोलीस यंत्रणेचा वापर करुन शिवसेनेकडून माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोप भाजप नेते आशिष शेलार यांनी केला आहे.
खोट्या तक्रारी, गुन्हे दाखल करुन आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न जरी केलात, तरी ठाकरे सरकारच्या अशा अहंकारासमोर झुकणार नाही, दबणार नाही.. जनतेच्या प्रश्नांचा संघर्ष अधिक जोमाने करु! @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @ChDadaPatil pic.twitter.com/lM94h8RZcs
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) December 8, 2021
वरळी दुर्घटनेतील जखमींना नायर रुग्णालयात योग्य उपचार का मिळाले नाहीत, हाच माझा सवाल आहे. या प्रश्नांची उत्तरे देता येत नसल्यानेच जे मी बोललो नाही, ते मुद्दाम निर्माण करुन माझ्यावर खोट्या केसेस टाकण्यात आल्या, असे आशिष शेलार म्हणाले आहेत.
माझ्या 25 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत आंदोलन सोडून हा पहिला गुन्हा दाखल झाला आहे. तोही खोट्या कुटनितीवर असल्याने या असत्य आणि खोट्याच्या विरोधात संघर्ष करायला डगमगणार नाही, अशा असनदशीर दमदाटीला, दडपशाहीला घाबरणार नाही, आणि जनसेवेचा घेतलेला
वसा टाकणार नाही. @BJP4Maharashtra— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) December 9, 2021
ज्या पत्रकार परिषदेवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या पत्रकार परिषदेचा व्हिडीओ आजही युट्युबवर उपलब्ध आहे. त्यातील सत्य, जे सत्ताधारी पक्षाला बघायचे नसले तरी ते न्यायालयासमोर आम्ही नक्कीच मांडू. माझा न्याय व्यवसस्थेवर विश्वास आहे. सत्य समोर येईलच, असा विश्वास आशिष शेलार यांनी व्यक्त केला आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विरोधात आपण अवमानकारक बोललोच नाही, असे स्पष्टीकरण मा. खा. प्रियांका चतुर्वेदी यांनी दिलेय. त्यांची ही भूमिका हेच आमचे यश, जाब विचारला म्हणून आम्हालाच दोषी ठरवलेय. त्याचेही योग्य सनदशीर उत्तर आम्ही देऊच. ठाकरे सरकार सारखे असनदशीर वागणार नाही.
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) December 9, 2021
महत्वाच्या बातम्या:
- ‘त्या’ व्हायरल फोटोवर संजय राऊतांची संतप्त प्रतिक्रिया;म्हणाले,’ही महाराष्ट्राची संस्कृती नसून…’
- केवळ लष्करच नव्हे, तर अवघा देश या धक्कादायक घटनेमुळे हादरला आहे- राज ठाकरे
- बिपीन रावत यांच्या दुर्दैवी मृत्यूने संपूर्ण देश विषण्ण झाला- मुख्यमंत्री ठाकरे
- बिपीन रावत यांची संरक्षण क्षेत्रातील सेवा कायम लक्षात राहील- शरद पवार
- ‘त्यांच्या निधनामुळे मला…’, बिपीन रावत यांच्या निधनावर पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

