🕒 1 min read
नवी-दिल्ली : काल(८ डिसें.)तामिळनाडूमधील जंगलामध्ये भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला. जंगलात हे हेलिकॉप्टर कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. अपघातग्रस्त हेलिकॉप्टरमधून १४ जण प्रवास करत होते. त्यात भारताचे सीडीएस बिपिन रावत(Bipin Rawat) हे सुद्धा होते. भारतीय वायुसेनेने हेलिकॉप्टर अपघातात सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्यासह १२ जण शहीद झाल्याचे माहिती दिली आहे. यावरच देशभरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) यांनी ट्वीट करत या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिपिन रावत यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ‘जनरल बिपिन रावत हे एक अतुलनीय सैनिक होते. एक सच्चा देशभक्त. देशाचं लष्कर आणि सुरक्षा व्यवस्था अत्याधुनिक बनवण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. धोरणात्मक बाबींवर त्यांची मतं आणि दृष्टीकोन फार महत्त्वाचे असायचे. त्यांच्या निधनामुळे मला प्रचंड वेदना होत आहेत. ओम शांती,’असे ट्वीट पंतप्रधान मोदींनी केले आहे.
Gen Bipin Rawat was an outstanding soldier. A true patriot, he greatly contributed to modernising our armed forces and security apparatus. His insights and perspectives on strategic matters were exceptional. His passing away has saddened me deeply. Om Shanti. pic.twitter.com/YOuQvFT7Et
— Narendra Modi (@narendramodi) December 8, 2021
दरम्यान, या हेलिकॉप्टरमधून बिपिन रावत वेलिंग्टनच्या डिफेंस स्टाफ कॉलेजमध्ये जात होते. या महाविद्यालयात बिपीन रावत यांच लेक्चर होतं. या कार्यक्रमानंतर ते दिल्लीला रवाना होणार होते. कुन्नूर इथल्या घनदाट जंगलात हेलिकॉप्टरचा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की अपघात झाल्याच्या चारही बाजूंनी आगीचे लोळ दिसत होते. हेलिकॉप्टर दुर्घटनेची माहिती मिळताच तिथे रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आले. तसेच मिळालेल्या माहितीनुसार या हेलिकॉप्टरमध्ये सीडीएस जनरल बिपिन रावत, मधुलिका रावत, बिपिन रावत यांच्या पत्नी, ब्रिगेडियर एल. एस. लिद्दर, लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंह, नायक गुरसेवक सिंह, नायक जीतेंद्र कुमार, लांस नायक विवेक कुमार, लांस नायक बी साई तेजा, हवालदार सतपाल हे होते.
महत्वाच्या बातम्या:
- केवळ लष्करच नव्हे, तर अवघा देश या धक्कादायक घटनेमुळे हादरला आहे- राज ठाकरे
- बिपीन रावत यांच्या दुर्दैवी मृत्यूने संपूर्ण देश विषण्ण झाला- मुख्यमंत्री ठाकरे
- हेलिकॉप्टर दुर्घटनेनंतर नितीन गडकरींची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले…
- ‘रविचंद्रन अश्विन अशीच गोलंदाजी करत राहिल्यास कुंबळेलाही मागे टाकेल’
- मावशी पद्मीनी कोल्हापूरेंनी केलेल्या कमेंटमुळे श्रध्दा कपूरची पोस्ट आली चर्चेत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
