मुंबई: काल (८ डिसेंबर)तामिळनाडूमधील जंगलामध्ये भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला. जंगलात हे हेलिकॉप्टर कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. अपघातग्रस्त हेलिकॉप्टरमधून १४ जण प्रवास करत होते. त्यात भारताचे सीडीएस बिपिन रावत हे सुद्धा होते. भारतीय वायुसेनेने हेलिकॉप्टर अपघातात सीडीएस जनरल बिपिन रावत(CDS General Bipin Rawat)यांच्यासह १२ जण शहीद झाल्याची माहिती दिली आहे. यावरच देशभरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्वीट करत या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.
संरक्षण दल प्रमुख जनरल बिपीन रावत, त्यांच्या पत्नी व सोबतच्या लष्करी अधिकाऱ्यांच्या झालेल्या दुर्दैवी मृत्यूने संपूर्ण देश विषण्ण झाला आहे. या शूरवीरांच्या आत्म्याला शांती लाभावी तसेच या सर्वांच्या कुटुंबियांना हा दुर्देंवी आघात सहन करण्याची शक्ती मिळावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना. असे ट्वीट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
संरक्षण दल प्रमुख जनरल बिपीन रावत, त्यांच्या पत्नी व सोबतच्या लष्करी अधिकाऱ्यांच्या झालेल्या दुर्दैवी मृत्यूने संपूर्ण देश विषण्ण झाला आहे. या शूरवीरांच्या आत्म्याला शांती लाभावी तसेच या सर्वांच्या कुटुंबियांना हा दुर्देंवी आघात सहन करण्याची शक्ती मिळावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) December 8, 2021
दरम्यान या हेलिकॉप्टरमध्ये सीडीएस जनरल बिपिन रावत, मधुलिका रावत, बिपिन रावत यांच्या पत्नी, ब्रिगेडियर एल. एस. लिद्दर, लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंह, नायक गुरसेवक सिंह, नायक जीतेंद्र कुमार, लांस नायक विवेक कुमार, लांस नायक बी साई तेजा, हवालदार सतपाल हे होते.या हेलिकॉप्टरमधून बिपिन रावत वेलिंग्टनच्या डिफेंस स्टाफ कॉलेजमध्ये जात होते. या महाविद्यालयात बिपीन रावत यांच लेक्चर होतं. या कार्यक्रमानंतर बिपीन रावत दिल्लीला रवाना होणार होते. कुन्नूर इथल्या घनदाट जंगलात हेलिकॉप्टरचा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की अपघात झाल्याच्या चारही बाजूंनी आगीचे लोळ दिसत होते.
महत्वाच्या बातम्या:
- ‘या’ प्रसिद्ध मोबाईल कंपनीच्या टॉवरचे साहित्य औरंगाबाद महापालिकेकडून जप्त
- आयसीसी क्रमवारीत भारतीय फलंदाजांची जबरदस्त झेप, अश्विनलाही झाला मोठा फायदा
- हेलिकॉप्टर दुर्घटनेनंतर नितीन गडकरींची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले…
- ‘रविचंद्रन अश्विन अशीच गोलंदाजी करत राहिल्यास कुंबळेलाही मागे टाकेल’
- मावशी पद्मीनी कोल्हापूरेंनी केलेल्या कमेंटमुळे श्रध्दा कपूरची पोस्ट आली चर्चेत


