Share

कोस्टल प्रकल्पामध्ये अफरातफर; आशिष शेलारांचा शिवसेनेवर गंभीर आरोप

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीला काही महिन्यांचा वेळ असताना भाजपने आतापासूनच शिवसेनेवर गंभीर आरोपांचे सत्र सुरु केले आहे. मुंबई कोस्टल रोड प्रकल्प हा शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ समजला जातो. याच मुद्द्यावरुन भाजपचे नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेला चांगलेच धारेवर धरले आहे.

मुंबई महापालिकेच्या कोस्टल रोड प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर आर्थिक अफरातफर झाली आहे, असा गंभीर आरोप भाजपचे नेते आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. कॅगच्या अहवालाचा दाखला देत त्यांनी महापालिका प्रशासन, सत्ताधारी शिवसेना आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप सत्र सुरु केले.

मुंबई महानगर पालिका ठरवून बनावाबनवी आणि गोंधळाची स्थिती करत आहे. मुंबईतील कोस्टल रोड प्रोजेक्टबाबत मुंबईत चालले काय? महापालिकेने कोस्टल रोडच्या सल्लागारांना अधिक रक्कम दिली आहे, असा गंभीर आरोप आशिष शेलार यांनी केला आहे.

6 सप्टेंबर 2021 आणि 2 ऑक्टोबर 2021 रोजी मी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी कोस्टल रोड प्रकल्पात भ्रष्टाचार होत असल्याचे मी सत्ताधाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले होते. मात्र आजही या प्रकल्पात अनागोंदी आणि अफरातफरी चालू आहे. या प्रकल्प सल्लागार असलेल्या एजन्सींना बेकायदेशीरपणे आर्थिक मदत केली जात आहे. मुंबई महापालिकेचा पैसा त्यांच्या घशात जात आहे. त्यांना अवास्तव आणि अनाकलनीय बिलाचे पैसे दिले, असा आरोप आशिष शेलार यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!