Share

‘उपोषण करा नाहीतर मरा, सरकारला कुठलंही सोयरसुतक नाही’

Published On: 

अहमदनगर: एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन गेल्या अनेक आठवड्यांपासून सुरू आहे. वेतनवाढ केली असली तरी आंदोलक विलीनीकरण करण्याच्या मुद्द्यावर ठाम आहेत त्यामुळे आंदोलन मागे घेण्यास तयार नाहीत. अशातच परिवहन मंत्री अनिल परब यांनी कामावर आलात तरच वेतन दिले जाईल, असा इशारा देखील दिला आहे त्यामुळे कर्मचारी पुन्हा कामावर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री व भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी राज्य सरकारवर आरोप केले आहेत.

आमच्या सरकारच्या काळात मोर्च्यांनी रेकॉर्ड मोडले. मात्र आम्ही प्रत्येक मोर्चाला स्वतःहून सामोरे जायचो. या सर्वाचा मी साक्षीदार आहे. मात्र या सरकारमध्ये कोणी कोणाची दखल घेत नाही. तुम्ही मोर्चा काढा उपोषण करा किंवा मरा, या सरकारला कुठलंही सोयरसुतक नाही, असा गंभीर आरोप राज्यसरकारवर केला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चाला मंत्री जाऊन भेटले असते तर हा प्रश्न तेव्हाच मिटला असता, असे गिरीष महाजन म्हणाले आहेत.

महाविकास आघाडी सरकारने राज्याला दहा वर्षे मागे नेऊन ठेवले हे दुर्दैवी आहे. या सरकारमध्ये एवढ्या चौकशा सुरु आहेत की भ्रष्टाचाराला लिमिटच राहिलेले नाही. कायदा सुव्यवस्था कुठेच राहिली नसून राज्यात काय चाललंय याची कल्पना करू शकता. हे तीन पक्षाचे सरकार आहे. मात्र कोनामध्येही एकमत नाही. अनेक मंत्र्यांवर गंभीर आरोप आहेत. तरीही कारवाई केली जात नाही. हा या सारकामध्ये निर्लज्जपणाचा कळस आहे. बदल्यांमध्ये पैसे घ्यायचे याच्या व्यतिरिक्त सरकारला काम नाही, असेही गिरीश महाजन म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!