मुंबई : अयोध्येतील बाबरी मशिद ६ डिसेंबर १९९२ रोजी पाडण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर काल ६ डिसेंबरचेच औचित्य साधून, शिवसेनेचे सचिव आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकरांनी बाबरी मशिदसंदर्भात एक ट्विट केले. अयोध्येत राममंदिर निर्माणासाठी बलिदान केलेल्या शिवसैनिकांना कोटी कोटी नमन, असे नार्वेकर ट्विटमध्ये म्हणले होते. त्यानंतर या ट्विटवरुन राजकीय वर्तुळात नवा वाद सुरु झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे.
— Milind Narvekar (@NarvekarMilind_) December 6, 2021
तसेच याविषयी प्रतिक्रिया देत शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले होते की,’काही गोष्टी विसरायला हव्यात, अध्याय संपला आहे. राम मंदिर उभं राहतंय. देश एक रहावा यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.’
'बाबरी विध्वंसाचा अध्याय संपला','काही गोष्टी विसरायच्या असतात' असा सल्ला संजय राऊतांनी मिलिंद नार्वेकरांना दिला आहे.
सत्तेसाठी कमरेचे हिंदुत्वाचे नेसण सोडणाऱ्यांना नार्वेकरांच्या ट्विट मुळे अल्पसंख्याक मतांची नवी सोयरीक तुटण्याची भीती वाटली असावी. pic.twitter.com/HqIupJQK9e— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) December 7, 2021
दरम्यान, राऊतांच्या या वक्तव्यावर भाजपचे कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी प्रत्युत्तर दिले असून यासंदर्भात ट्विट करत ते म्हणले आहेत की,”बाबरी विध्वंसाचा अध्याय संपला’,’काही गोष्टी विसरायच्या असतात’ असा सल्ला संजय राऊतांनी मिलिंद नार्वेकरांना दिला आहे. सत्तेसाठी कमरेचे हिंदुत्वाचे नेसण सोडणाऱ्यांना नार्वेकरांच्या ट्विट मुळे अल्पसंख्याक मतांची नवी सोयरीक तुटण्याची भीती वाटली असावी’, असे ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- चिंताजनक! राज्यात नव्या व्हेरिएंटने बाधित रुग्णसंख्या १० वर
- …तरी केंद्रातील विद्यमान सत्ताधारी जीएसटीच्या प्रेमात आकंठ बुडालेत- संजय राऊत
- शिवेंद्रराजे भोसलेंना शशिकांत शिंदेंचा खोचक टोला; म्हणाले,’माझी शिफारस नसल्यामुळे…’
- …तर ओमायक्रॉनचा एक रुग्ण १५-२० जणांना बाधित करु शकतो- डॉ.अमित द्रविड
- ‘केंद्र सरकारने आरक्षणाचे प्रस्ताव सभागृहात मांडून त्यांना न्याय देण्याची ठाम भूमिका घ्यावी’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

