Share

‘अजित पवारांमुळेच पदोन्नतीतील आरक्षण रद्द झालं, ते राज्य चालवायच्या लायकीचे नाही’

Published On: 

मुंबई : ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्याच्या राजकारणामध्ये मोठा वाद सुरु झाला आहे. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील ओबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. आता या मुद्यावरून राजकारण तापू लागले आहे. यावरुन भाजप (BJP) नेते गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी थेट पवार कुटुंबावर निशाणा साधला आहे.

पवार कुटुंब ओबीसी (OBC) आरक्षणाचे कर्दनकाळ आहेत. तसेच अजित पवारांमुळेच पदोन्नतीतील आरक्षण रद्द झालं आहे. ओबीसीचे आरक्षण संपवण्याचा डाव महाविकास आघाडी सरकारचा असून अजित पवार यांचा जातीयवाद उफाळून येत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आयोगाला निधी दिला नाही. त्यांच्या मनात ओबीसींबद्दल आकस आहे. त्यांच्यामुळेच पदोन्नतीतील आरक्षण रद्द झाले आहे, अशी घणाघाती आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.

राज्य सरकारने आधी पदोन्नतीचे आरक्षण रद्द करून आपण एससी, एसटी, ओबीसी, भटक्या विमुक्त जाती विरोधात आहोत हे दाखवून दिले आहे. ओबीसी आरक्षण विरोधात शरद पवार यांचे कुटुंबीयच आहेत. उद्या आहे ते शैक्षणिक आरक्षण ही संपवतील, असा आरोपही गोपीचंद पडळकरांनी यावेळी केला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने इम्परिकल टाटा जमा करा हे केंद्र सरकारला सांगितले नाही. प्रत्येक गोष्ट केंद्राने करावी असं वाटत असेल तर मग राज्य कशाला चालवता? तुम्हाला काम करता येत नसेल आणि रोज उठून केंद्राकडे बोट दाखवत असाल तर राज्य केंद्राकडे देऊन टाका, असेही गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!